A woman gave birth on the street Along with her husband and newborn child.
A woman gave birth on the street Along with her husband and newborn child.esakal

Jalgaon News : ..अन् इथे ओशाळली माणुसकी! पोटच्या गोळ्याला विकणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती...

Published on

Jalgaon News : शहरातील बाजारपेठेत उघड्यावर निवारा शोधून राहणारी एक आदिवासी महिला रस्त्यावरच प्रसूत झाली. प्रसूती कळांनी विव्हळणाऱ्या या महिलेकडे पाहून, हळहळ व्यक्त करून अनेक जण पुढे निघून जात होते.

परंतु, बराच वेळ मदतीसाठी कुणीही पुढे धजावले नाही. अखेर माणुसकी ओशाळली अन् काहींनी पुढे येऊन रुग्णवाहिका आणि आर्थिक हातभार लावत रुग्णालयात दाखल केले. बाळ, बाळंतीण आता सुखरूप आहेत. या घटनेमुळे मात्र समाजमन सुन्न झाले. (woman gave birth to baby on road jalgaon news)

मजुरी करणारी एक महिला घरोघरी मागून खाणे, पोट भरणे असा तिचा नित्यनियम. एक-दोन नव्हे, तर नऊ मुले तिने जन्माला घातली. एक बाळ मात्र पोषण व उपचारांअभावी मृत झाले आहे. हिच महिला गुरुवारी (ता. २०) सकाळी तिरंगा चौकात रस्त्यावर प्रसूत झाली. महाजन रेस्टॉरंटचे मालक भाऊसाहेब महाजन यांचे मन हेलावले.

त्यांनी तत्काळ रिक्षा बोलावली, पैसेही देऊ केले. मात्र, सकाळी-सकाळी रक्ताने रिक्षा भरेल म्हणून कोणीही पुढे आले नाही. दोन-तीन महिला जवळून गेल्या. मात्र, त्याही पाहून निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला. तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली. मात्र, कोणीही मदत करीत नव्हते.

एका अनोळखी महिलेने पुढे येत मदत केली, तर बापू आप्पा बिऱ्हाडे, किरण बागूल यांनी चादर आणली. त्यात नवजात बालकाला गुंडाळले. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका आली. डॉ. इम्रान कुरेशी यांनी बाळ आणि माता यांच्यावर प्रथमोपचार केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A woman gave birth on the street Along with her husband and newborn child.
Raver Flood News : सातही मंडळांत दुसऱ्यांदा अतिवृष्टी; रावेर तालुक्यात 150 घरांची पडझड

त्या महिलेच्या दुसऱ्या पतीला रुग्णालयात जायला सांगितले, तेव्हा त्याने पैसे नसल्याचे सांगितले. भाऊसाहेब महाजन यांनी स्वतः १०० रुपये मदत करताच उपस्थितांनी कुणी ५०, कुणी १०, तर कुणी २० रुपये मदत केली. ते सर्व पैसे नवजात बालक आणि बाळंतीणसाठी देत त्यांना १०८ रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

आपबितीने अनेकांचे डोळे पाणावले

या महिलेची दुर्दैवी कहाणी अशी आहे, की एक वर्षापूर्वी या महिलेला पोटच्या गोळ्याला विकताना पकडण्यात आले होते. पोलिसांना आपबिती सांगताना अनेकांचे डोळे पाणावले होते. कोरोना काळात तिचा पहिला पती मृत झाला. तरी एकापाठोपाठ तिला सात मुले झाली होती.

त्यांचे पोट भरणे कठीण झाल्याने तिने स्वतःच्या पोटचे गोळे विकण्याचा निर्णय घेतला होता. तिला महिला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा ती प्रसूतकळांनी विव्हळत होती. तिला मुलगा झाला असून, ग्रामीण रुग्णालयात बाळ व तिच्यावर उपचार करण्यात आले. तिची प्रकृती सुधारली आहे. या महिलेची आधीची सात मुले एरंडोल आश्रमशाळेत टाकण्यात आली आहेत.

A woman gave birth on the street Along with her husband and newborn child.
Cyber Crime News : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; फेक अकाऊंट काढून बदनामी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()