यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील बोरावल बुद्रूक येथे शेतात निंदणी करणाऱ्या महिलेचा गावठी बनावटीच्या हातबॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (ता. १६) दुपारी घडली. जखमी महिलेवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगाव येथे हलविण्यात आले आहे. रानडुकरांच्या शिकारीच्या उद्देशाने फासेपारधींनी हातबॉम्ब शेतात पुरल्याचा संशय आहे. ( Women farm labor seriously injured in Village bomb blast Jalgaon News)
बोरावल बुद्रूक (ता. यावल) या शेतशिवारात तापी नदीच्या किनारी नरेश लक्ष्मण जावळे (रा. राजोरा) या शेतकऱ्याचे शेत असून, या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केली आहे. या हरभऱ्याच्या शेतात शुक्रवारी शेतमजूर बेबाबाई पंडित सोनवणे (५५, रा. राजोरा) यांना निंदणी करीत असताना एक गोळा आढळला.
महिलेच्या स्पर्शाने छेडछाड दरम्यान गोळ्याचा स्फोट होऊन त्यात बेबाबाई सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली. या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत. ब्लास्टनंतर शेतातील मजुरी करणाऱ्या महिला सैरावैरा पळाल्या.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
महिलेची प्रकृती गंभीर
शेतकरी नरेश जावळे यांनी जखमी अवस्थेतील महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण, अधिपरिचारिका मनीषा धांडे, नेपाली भोळे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले व त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
शिकारीचा उद्देश?
शेतासह परिसरात फासेपारधींकडून रानडुकरांच्या शिकारीसाठी अशा पद्धतीने गावठी बनावटीचे हातबॉम्ब बनवून जमिनीत पुरले जातात. शेत मशागतीत हा बॉम्ब जमिनीत गाडला गेल्याचा अंदाज असून, महिलेने त्यास स्पर्श करून छेडछाड केल्याने त्याचा स्फोट झाल्याचे शेतकरी नरेश भंगाळे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.