जळगाव : बोराखेडी (ता. मोताळा) येथून चोरून आणलेल्या बकऱ्या एमआयडीसीतील जनावरांच्या बाजारात विक्री करताना दोन महिलांना अटक करण्यात आली.
चोरलेल्या बकऱ्या मालकांनी व्हिडीओ कॉलींगद्वारे ओळखले आहे. जळगाव एमआयडीसीत दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. त्यात जनावरे, कोंबड्याही खेड्यांवरून विक्रीला येतात. (Women gang arrested for stealing goats Jalgaon Crime New)
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
शनिवारी दोन महिला बकऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. पोलिस नाईक अल्ताफ पठाण, विशाल कोळी यांना चोरीच्या बकऱ्या विक्रीला आल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांनी बाजारात जाऊन खात्री केली असता, त्यांना बकऱ्या विक्रीसाठी आलेल्या महिलांवर संशय आला.
डशा पांडुरंग काटे (वय ५०) व सपना रवीद्र गोंधळी (३२) या दोघी महिलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, तेथे बकऱ्या चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. संशयित महिलांना बकऱ्यांसह ताब्यात घेतले असून, सहा बकऱ्या व दोघा महिलांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.