Jalgaon News : कच्‍ची चारी कोरून सांडपाणी काढण्याचा घाट; महापालिकेचा अजब कारभार

Chari carved in Dwarkanagar area.
Chari carved in Dwarkanagar area. esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील काही भागांमध्‍ये गटारींची कामे सुरू आहेत. यात वाढीव वस्‍ती असलेल्‍या द्वारकानगर परिसरात गटारींचे काम सुरू आहे.

मात्र, पक्‍की गटार करून पुढे काही भागात केवळ चारी कोरून सांडपाणी पुढच्‍या गटारीला जोडण्याचे काम सुरू आहे. (work of connecting waste water to next sewer by making only small way in some areas after making concrete sewer jalgaon news)

महापालिकेचा हा अजब कारभार पाहावयास मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील निमखेडी शिवारातील द्वारकानगर भागात गटारींचे काम सुरू आहे. या परिसरातील गट क्रमांक ११८/४ व ११८/५ या भागातील गटारी मंजूर आहेत. यात सध्‍या ११८/४ या गटात गटारींचे काम सुरू आहे.

या भागातील काही काम झाले असून, या भागातील येणारे सांडपाणी ११८/६ या गटातील गटारीला जोडले जात आहे. असे करीत असताना, मध्‍येच केवळ चारी कोरली जात आहे. यामुळे येथून सांडपाणी निघणे अशक्‍य आहे. यामुळे गटारी ब्‍लॉक होऊन सांडपाणी तुंबण्याची शक्‍यता असून, या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Chari carved in Dwarkanagar area.
Unseasonal Rain Crop Damage : पावणे 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

महिलांनी रोखले काम

द्वारकानगर परिसरातील ११८/४ मधील सांडपाणी पक्‍की गटार न करताच ११८/६ मधील गटारीला जोडले जात आहे. हिरा-शिवा पार्क, खोटेनगरचा काही भाग येथून येणारे सांडपाणी सरळ गटार करून मुख्‍य गटारीला जोडणे गरजेचे आहे. मात्र, असे काम केले जात नसून कॉलनीतील लहान गटारीला जोडले जात आहे. यामुळे या भागातील नागरकांना होणारा त्रास पाहता परिसरातील महिलांनी जेबीसीद्वारे चारी कोरण्याचे काम थांबविले आहे.

मुख्‍य गटारीचे काम कधी?

याच परिसरातील मुख्‍य रस्‍त्‍यालगत मोठी गटारीचे काम होणे आवश्‍यक आहे. मुळात या मोठ्या गटारीला इतर गटारींमधून जाणारे सांडपाणी सोडणे आवश्‍यक आहे. मात्र, असे काम होताना दिसून येत नाही. अद्याप मुख्‍य गटारीच्‍या कामाचा मुहूर्त सापडला नसल्‍याने सांडपाणी इतरत्र सोडले जात असल्‍याचा प्रकार केला जात आहे.

Chari carved in Dwarkanagar area.
Jalgaon News : उपमहापौरांनीच अधिक निधी आपल्या प्रभागात वापरला; पोकळेंचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.