Jalgaon News : महसूलच्या कामाला आजपासून गती; संपानंतर सलग 3 दिवस सुटया

Revenue Collection
Revenue Collectionesakal
Updated on

Jalgaon News : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांना ग्रेड पे ४८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी गेल्या सोमवार (ता. ३)पासून तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले होते. गुरुवारी (ता. ६) सायंकाळी संप मिटला. (work of revenue department will speed up from 10 april jalgaon news)

मात्र, शुक्रवारी (ता. ७) सुटी असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९), अशा सलग तीन दिवस सुटी होती. सोमवार (ता. १०)पासून महसूल विभागाच्या कामांना गती येणार आहे. दरम्यान, नागरिकांची शासकीय कामे रखडली होती. यामुळे नागरिकांची निराशा झाली होती.

संप काळात कर्मचारी कामावर होते. मात्र, तहसीलदार, नायब तहसीलदार नसल्याने नागरिकांच्या प्रकरणांवर सह्या करणार कोण, अशी स्थिती तहसीलदार कार्यालयात होती. मार्च महिन्यात सात दिवस शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली होती. नंतर तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन केल्याने नागरिकांची कामे पुन्हा ठप्प झाली होती.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Revenue Collection
Jalgaon News : संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कधी मिळणार? शेतकऱ्यांची आर्त हाक

शासनाने २०१५ मध्ये नायब तहसीलदारांना ४८०० ग्रेड पे देण्याबाबत तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर आलेल्या बक्षी समितीने या मागणीचा विचार केला नाही, तसेच शासनानेही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते.

महसूल मंत्र्यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नंतर मागण्या मंजुरीचे आश्‍वासन मिळाले. त्यामुळे संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

Revenue Collection
Jalgaon Crime News : सुप्रीम कॉलनीत पूर्व वैमानस्यातून घमासान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.