Jalgaon News : तरसोद फाट्याजवळील उड्डाणपुलाच्या कामाचा वेग मंदावला; कामावर मजुरांची कमतरता

Highway four-lane work is progressing at a slow pace near Tarsod Fata.
Highway four-lane work is progressing at a slow pace near Tarsod Fata. esakal
Updated on

Jalgaon News : पाळधी ते तरसोददरम्यान बायपास मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. (work on flyover near Tarsod Fata scheduled for June will be delayed by 2 months jalgaon news)

तरसोद फाट्याजवळ संथ गतीने सुरू असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम.
तरसोद फाट्याजवळ संथ गतीने सुरू असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम.esakal

येत्या जूनपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, तरसोद फाट्याजवळील उड्डाणपूल, साइड रस्त्याच्या कामासाठी केवळ सहा ते आठ मजूरच काम करीत आहेत. यामुळे काम पूर्ण होण्यास ऑगस्ट उजाडण्याची चिन्हे आहेत.

वाहतुकीचा भार होणार कमी

तरसोद ते फागणेदरम्यानच्या चौपदरीकरणास अगोदरपासूनच विलंब होत आहे. कधी मजूर नसतात, कधी कंत्राटदार काम सोडून चालला जातो, कधी मटेरिअल लवकर मिळत नाही, अशा एक ना अनेक अडचणी या कामांमध्ये आल्या आहेत. तरसोद ते फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने मध्यंतरी वेग पकडला होता.

आता तरसोद फाट्याजवळील कामाचा वेग अतिशय ‘कूर्म’ गतीने सुरू आहे. जळगावपासून भुसावळकडे जाताना पाच किलोमीटरवर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून बायपासचे काम सुरू आहे. तरसोद ते पाळधी या २३ किलोमीटरच्या कामाला नोव्हेंबर २०२० मध्ये सुरवात झाली होती. मध्यंतरी अनेक अडथळे आले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Highway four-lane work is progressing at a slow pace near Tarsod Fata.
Jalgaon ZP News : जिल्हा परिषदेत सहाशेवर रिक्त पदे भरणार

मार्च २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने मुदतवाढ मागून जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करू, असे सांगितले होते. मात्र, सध्या धिम्या गतीने केवळ सहा ते आठ मजुरांवरच काम सुरू आहे. यामुळे काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट उजाडेल, अशी स्थिती आहे. उड्डाणपुलाला जोडणाऱ्या पुलाजवळ भराव टाकण्याचे काम महिनाभरापासून सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

अंडरपासमधील रस्ता कच्चा

अंडरपासमधील रस्ता अद्यापही कच्चा आहे. जळगावकडून भुसावळकडे पुलाच्या साइडने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम बाकी आहे. मुख्य उड्डाणपुलाला जोडण्यासाठी रस्त्याचे कामही अपूर्ण आहे. त्यात सहा ते आठच कर्मचारी असल्यामुळे कामाला वेग कसा येणार, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे.

एकेरी रस्त्यावर वाहतूक कोंडी

तरसोद फाट्याजवळ भुसावळकडे जाण्यास एकेरी रस्ता आहे, तोही अरुंद आहे. मोठी व लहान वाहनांच्या गर्दीमुळे येथे नेहमी कोंडी होते. तरसोदकडील ग्रामस्थांना जळगावकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाखालून रस्ता केला आहे. मात्र तो कच्चा रस्ता आहे. रात्री तेथे अंधार असतो. साइडला रस्त्याच्या कामासाठी खड्डे तयार केले आहेत.

मात्र त्यात अंधारामुळे दुचाकी, चारचाकी पडण्याचा धोका आहे. कंत्राटदाराने या रस्त्यावर दिवे लावावेत, कामाला वेग पकडावा, जेणेकरून वाहतुकीची कोंडी सुटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. हे काम पूर्ण होऊन बायपास रस्ता सुरू झाल्यास शहरातील वाहतुकीचा भार कमी हेाण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

Highway four-lane work is progressing at a slow pace near Tarsod Fata.
Jalgaon News : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हा राज्यात प्रथम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.