Jalgaon Protest : पारोळ्यात सफाई कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन; ‘त्या’ आदेशाने आक्रमक पवित्रा

Statement of Demands from the Sanitation Staff Association Officer giving to Tushar Patil.
Statement of Demands from the Sanitation Staff Association Officer giving to Tushar Patil. esakal
Updated on

Jalgaon Protest : येथील नगरपालिकेच्या तीन सफाई कामगारांना नोकरीतून काढून टाकले असून, तिघांची एक वेतनश्रेणी कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेला हा आदेश मागे घ्यावा व काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित कामावर घ्यावे, या मागणीसाठी पारोळा नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले.

दरम्यान, या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होत आहे. रुपेश सुरेश पारोचे, पद्मिनी तुषार नरवाडे, ज्योती शिवदास पारोचे यांना प्रशासक तथा मुख्याधिकारी पारोळा यांनी कामावरून काढून टाकले आहे. (Work stop movement of cleaning workers in Parola jalgaon news)

याबाबत या कर्मचाऱ्यांना कुठलीही माहिती न देता हा निर्णय घेतला आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

तसेच या कर्मचाऱ्यांच्या विरोधात खोटी साक्ष द्यावी म्हणून तीन कर्मचारी अल्ताफ शफी शेख मेहतर, सिकंदर मुख्तार मेहतर, विनोद ज्ञानेश्वर पवार यांची एक वेतन वाढ कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला असून, ही कारवाई मागे घ्यावी, यासाठी आम्ही काम बंद आंदोलन करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांची माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.

दरम्यान, पारोळा पालिकेचे एकूण ५२ सफाई कर्मचारी असून, यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष बापू पवार, माजी नगरसेवक पी. जी. पाटील, ॲड. तुषार पाटील यांनी भेट दिली, तसेच कर्मचारी व इतर संघटनेचा सफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे. दरम्यान, ॲड. तुषार पाटील यांनी यावेळी आंदोलनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Statement of Demands from the Sanitation Staff Association Officer giving to Tushar Patil.
Coffee With Sakal : केळीवरील प्रक्रिया उद्योग, ‘गोल्ड हब’सह पर्यटन विकासावर भर : जिल्हाधिकारी प्रसाद

"नगरपरिषद प्रशासक हे सफाई कामगारांवर अन्याय करतात. याबाबतचा मी वेळोवेळी जाब विचारला. तसे निवेदन आयुक्त, नगरपरिषद शाखा, जळगाव यांच्याकडे दिले होते. त्या संदर्भात कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. आता या विषयी कुठलीही चौकशी न होता आमच्या कामगारांवर अन्याय झालेला आहे. त्यास न्याय मिळावा." - शिवदास पारोचे, नगरपरिषद सफाई कामगार संघटना प्रमुख, पारोळा

"या कामगारांबाबत झालेल्या निर्णयासंदर्भात चर्चा करून तसेच विधिवत मार्गाने हा प्रश्न सोडवावा. संपूर्ण प्रशासनास वेठीस धरू नये, अशी विनंती करण्यात आली आहे." - सुभाष थोरात, भारतीय मजदूर संघ, पारोळा

"कार्यालयीन कामकाज सुरूच राहील. ज्या कामगारांना या निर्णयामुळे नोकरीवर व वेतन वाढीवर परिणाम झाला आहे, त्यांनी संविधानिक मार्गाने लढा द्यावा. अशाप्रकारे प्रशासनास वेठीस धरू नये. याबाबत मी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार आहे. विद्यमान प्रशासन ज्योती भगत या रजेवर आहेत. दैनंदिन कामकाजाची जबाबदारी माझ्यावर आहे.' - रवींद्र लांडे, प्रभारी प्रशासक तथा मुख्याधिकारी पारोळा.

Statement of Demands from the Sanitation Staff Association Officer giving to Tushar Patil.
Jalgaon News : ‘बाबा मला शिक्षण घेऊ द्या...’ मुलींनी लिहिले पत्र; पालकांना भावनिक आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.