Jalgaon : महापालिकेत 170 कोटींची कामे अपूर्णच; 11 जुलैनंतर भडका उडणार?

Jalgaon Municipal Corporation latest marathi news
Jalgaon Municipal Corporation latest marathi newsesakal
Updated on

जळगाव : महापालिकेत (jalgaon municipal Corporation) प्रशासनाच्या दिरंगाईबाबत पदाधिकाऱ्यांनी आसूड ओढले, त्यामुळे निधीची परिस्थिती आणि कामे याबाबतची माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमृत, भुयारी गटारी योजना वगळता तब्बल १७० कोटी रुपयांची कामे अद्यापही अपूर्णच असल्याचे दिसून आले आहे. (Works worth Rs 170 crore incomplete in JMC Jalgaon Municipal Corporation News)

विकास कामे करण्यासाठी निधीची अत्यंत आवश्‍यकता असते. शासन स्तरावरून निधी मिळविणे म्हणजे एक कसरत असते. निधीची घोषणा झाली तरी प्रत्यक्ष निधी मंजूर होऊन त्यांची कामे सुरू होण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयापासून थेट मुंबईत मंत्रालयापर्यंत फेऱ्या माराव्या लागतात. त्यानंतर तो निधी उपलब्ध होऊन कार्य सुरू होते.

जळगाव महापालिकेत सद्य:स्थितीत थोडा थोडका नव्हे तर तब्बल १७० कोटी रूपयांचा निधी विविध विकास कामांसाठी आला असून त्यातील बहुतेक कामांना कार्यादेश दिले आहेत. मात्र त्यातील अर्ध्यापेक्षाही अधिक कामे सुरूच झालेली नाहीत, अशी धक्कादायक माहिती महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

असा निधी, असे अर्धवट काम
महापालिकेला जिल्हा नियोजन मंडळाकडून तब्बल ६० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. नागरी दलितेतर वस्ती सुधार निधी १३ कोटी १२ लाख, राष्टीय महामार्गावरील रस्त्यावरील पथदिवे लावण्यासाठी ३ कोटी ६९ लाख, महाराष्ट्र सुवर्णजयंती निधी १५ कोटी ९९ लाख १४५ रुपये, चार मुख्य रस्त्यासाठी ६ कोटी तर शासनाने मंजूर केलेल्या शंभर कोटीतून ४२ कोटीचा निधी यातून शहरातील मुख्य रस्त्याची कामे घेण्यात आली आहेत.

इतर विभागातूनही निधी प्राप्त झाला असून तो साधारणतः १७० कोटी रुपयांपर्यंत आहे. या निधीतील कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. ती कामे वेगाने पूर्ण होण्याची गरज होती. परंतु प्रशासनाने केवळ चालढकलपणा केला आहे. त्यामुळे या निधीतील कामे अपूर्णच आहे. परिणामी जळगावकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय शासनाने महापालिकेला ५८ कोटी रूपयांच्या निधीचे प्रस्ताव पाठविण्याचे कळविले आहे.

तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आश्‍वासित केले होते. मात्र अद्यापही महापालिकेने या निधीचे प्रस्ताव तयार केलेले नसल्याचे सांगण्यात आले. या शिवाय ‘अमृत’ व भुयारी गटारीच्या कामाचाही निधी प्राप्त झाला आहे. परंतु त्याचे कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे.

Jalgaon Municipal Corporation latest marathi news
700 मुलींना गर्भमुख कॅन्‍सर प्रतिबंधात्‍मक लस

महापालिकेत वादाचा भडका उडणार
निधीची कामे प्रशासनाकडून होत नसल्यामुळे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात अंतर्गत आणि खुले वादही सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात या वादाचा भडका उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रशासनाच्या कारभारावर सत्ताधारी व विरोधी गटाचे अनेक नगरसेवक नाराज असल्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ११ जुलैनंतर जळगाव महापालिकेतील वादाचा भडका राजकीय स्तरावर उडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Jalgaon Municipal Corporation latest marathi news
नैराश्‍यातील विवाहिता आत्महत्येपासून परावृत्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.