World Health Day 2023 : हृदयविकाराने रोज किमान एक मृत्यू; आपणही हृदयरोगी आहोत का?

World Health Day
World Health Day eakal
Updated on

जळगाव : बदलत्या ‘लाइफस्टाइल’मुळे हृदयरोग सामान्य आजार झाला आहे. चाळिशी, पन्नाशी, अशा सर्व मर्यादा ओलांडत आता किशोवयीन अन्‌ तरुण मंडळीही हृदयरोगाचे बळी ठरत आहेत. जळगावसारख्या ठिकाणी हृदयरोगामुळे रोज एक मृत्यू होतो, असे समोर आलंय. (World Health Day 2023 At least one death per day from heart disease in jalgaon news)

त्यामुळे आपणही हृदयरोगी आहोत का, असा प्रश्‍न स्वत:लाच विचारून त्याबाबत काळजी अन्‌ उपचारांबाबत आपण जागरूक व गंभीर राहणे गरजेचे आहे. आज जागतिक आरोग्य दिन. धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीची स्वत:च्या आरोग्याप्रति असलेली उदासीनता व बदललेली जीवनशैली वाढत जाणाऱ्या आजारांचे मूळ बनलीय.

त्यातही हृदयरोगासारखा गंभीर आजार आता ‘कॅज्युअल’ म्हणजेच, सामान्य झाला आहे. अर्थात, त्याचे गांभीर्य तेवढेच असले, तरी तो आता बहुतांश व्यक्तींमध्ये आढळून येतो, म्हणूनच जळगावसारख्या शहरातही रोज एक जण हृदयरोगाचा बळी ठरतोय.

वयाच्या मर्यादाही पार

विशेष म्हणजे, साधारण दोन दशकांपूर्वी हृदयरोग प्रामुख्याने चाळिशी, पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींनाच व्हायचा, असा अनुभव होता. आता बदलत्या जीवनशैलीने ही वयोमर्यादाही बदलून टाकलीय. अगदी दहा वर्षांच्या मुलापासून विशीतल्या तरुणाचाही हृदयरोगाने बळी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

World Health Day
Municipal Online Services : मनपा नगररचना विभागाच्या परवानगी ऑनलाईन देण्यास प्रारंभ

अशा या हृदयरोगाला बाजूला ठेवण्यासाठी अथवा तो झाला, तरी त्यावरील प्रभावी उपचारासाठी काय केले पाहिजे, याबाबत प्रशितयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप भारुडे यांनी ‘सकाळ’शी विशेष संवाद साधला.

हृदयरोग म्हणजे काय?

हृदयाला तीन रक्तवाहिन्यांद्वारे रक्तपुरवठा होत असतो. या तीन वाहिन्यांमध्ये रक्त गोठून, रक्ताच्या गाठी होऊन रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास हृदयरोगाचा झटका येऊ शकतो. व्यसनाधीन, मधुमेह, रक्तदाबाचा आजार, स्थूलपणा, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना हृदयरोग होण्याची शक्यता अधिक असते.

हृदयरोगाची लक्षणे अशी ः

थोडे अंतर चालल्यानंतर, एखादा मजला चढला तरी धाप लागणे, छातीत डाव्या बाजूला दुखणे, मानेच्या मागच्या भागात दुखणे, अचानक पोट दुखणे, ॲसिडिटी वाढणे, पाठीत जास्त दुखणे, अचानक घाम येऊन बेचैनी वाढणे, अशी प्रमुख लक्षणे आपल्याला हृदयरोगाची सांगता येतील.

World Health Day
Jalgaon News : पाचोरा बाजार समितीचे आवर झाले पिवळेशार; मका, सोयाबीनची विक्रमी आवक

लक्षणे जाणवल्यास काय करावे?

वरीलपैकी एखादे लक्षण जाणवल्यास तातडीने हृदयरोग तज्ज्ञाशी संपर्क साधावा. तत्काळ इसीजी (इको कार्डिओग्राम) काढणे, टू डी इको, टीएमटी (स्ट्रेस टेस्ट), ॲन्जिओग्राफी यांसारख्या चाचण्या करून घेणे. अचानक रस्त्यावरच हृदयरोगाचा झटका आला असेल, तर स्वत:ला शांत ठेवून तातडीने हृदयरोगतज्ज्ञांकडे दाखल होणे गरजेचे आहे. रक्ताच्या गाठी झाल्याचे समजल्यानंतर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास आपल्याला हृदयरोग टाळता येऊ शकतो.

होऊ नये, म्हणून काय करावे?

फास्ट फूड व सर्व प्रकारची व्यसने टाळावीत. मधुमेह, रक्तदाब होऊ नये, म्हणून नियमित व्यायाम करावा. रोज किमान दोन किलोमीटर चालावे. योगासने करावा. रोजच्या खाण्यात मीठ, साखर, तेलाचे प्रमाण अत्यल्प करावे. ताणतणावापासून दूर राहावे. नियमित ध्यान-धारणा करावी.

"अलीकडे प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी हृदयरोगी आहे. आपल्याला लक्षणे जाणवली तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, हेही गंभीर आहे. त्यामुळे लक्षणे जाणवल्याबरोबर तज्ज्ञांशी संपर्क साधल्यास हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो." -डॉ. संदीप भारुडे

World Health Day
Jalgaon Temperature Rise : जळगावचे तापमान 39 अंशावर; मेमध्ये अधिक तापमानाची धास्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.