जळगाव : जळगाव-शिरसोली रोडवरून जळगावकडे येत असताना, दुचाकीस्वारास छोटा हत्ती मालवाहू वाहनचालकाने राँगसाईड जाऊन धडक दिली.
या अपघातात दुचाकीवर बसलेला दीड वर्षीय बालक चेंडूसारखा उडून खाली रोडवर पडला, तर दुचाकीस्वार वाहनासह फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. या अपघातात शेख अली शेख शरीफ दीड वर्षीय बालक जागीच ठार झाला. (Wrong Side Small elephant Four wheeler hits Bike Jalgaon Accident News)
शेख अमीन शेख आरीफ (वय २५) यांना १५ दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. रविवारी (ता. ११) अमीन शेख याने पत्नी व मुलीची भेट घेण्यासाठी सासरवाडीत शिरसोली येथे जाण्याचा बेत आखला. घरातून निघताना दीड वर्षीय पुतण्या अली यासही फिरवून आणू, असा विचार करून दोघे काका-पुतणे दुचाकीने शिरसोलीला आले होते.
मुलीला भेटून सायंकाळी घराकडे फातेमानगर येथे येण्यासाठी दुचाकीने निघाले. गावातून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर एचपी पेट्रोल पंपाजवळ समोरून सुसाट वेगात येणाऱ्या छोटा हत्ती (एमएच १९, सीवाय ३२९०) या मालवाहू वाहनचालकाने दुचाकीस्वारास राँगसाईड जाऊन जोरदार धडक दिली.
अपघातात दुचाकीस्वार वाहनासह फेकला गेला, तर दुचाकीवरील दीड वर्षीय अली हा चिमुरडा फुटबॉलसारखा हवेत उडून डोक्यावर पडल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक अमीन शेख गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पळू नको नाय तर मारू
अपघातानंतर छोटा हत्ती वाहन उलटले. त्यातील चालक वाहन सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, शिरसोली ग्रामस्थांनी त्याला पकडले. पळू नको नाय, तर पळवून पळवून मारू आणि नंतर पोलिसांत जमा करू, असा दम ग्रामस्थांनी भरला. त्यामुळे तो थांबला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
चालते वाहने सोडून लोक पळाले
दुचाकीच्या टाकीवर बसविलेला दीड वर्षीय अली हवेत उडताना ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना दिसला. जागीच वाहन थांबवून बाजारात फुल घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराने तशीच दुचाकी फेकत या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशिर झाला. छोटा हत्ती चालकाचे वाहन राँगसाईडला जाऊन दुचाकीला धडकत असल्याचे लोकांनी डोळ्यांनी बघितले.
अलीला फुलासारखं उचलल
एकीकडून शिरसोलीतील फुलेवाला बारी बंधू, तर दुसरी बाजूने वाहनधारक जुबेर खान मुलाच्या दिशेने झेप घेत पळाले. रस्त्यावरून बाळाला उचलताच त्याने एक जोरदार हिचकी देत हात पाय ढिले सोडले, हे बघताच फुलवाले बारी यांचे अवसान गळाले. चिमुरड्या अलीस घेऊन जुबेर खान जिल्हा रुग्णालयात घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले.
पित्याने फोडला टाहो...
जखमी अमीन शेख व त्याचे मोठे बंधू शरीफ शेख आरीफ असे दोघेही भाऊ एकत्र कुटुंबात एमआयडीसीच्या मागील फातेमानगरात वास्तव्याला असून, ते ट्रॅक्टर मेकॅनीक म्हणून ते काम करून गुजराण करतात. भावाचा अपघात झाल्याचा फोन आल्यावर शरीफ याच्यासह कुटुंबीय आणि गल्लीतील तरुणांनी अपघातस्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात आल्यावर चिमुरडा अली झोपलेल्या अवस्थेत पडून असल्याचे पाहत पित्याने एकच टाहो फोडला.
पाचोरा रोड मृत्यूच मार्ग
जळगाव-पाचोरा रोडचे नुकतेच काँक्रिटकरण झाले आहे. या रस्त्यावर सुसाट वाहनधारक आता लोकांच्या जिवावर उठले असून, अपघातांची मालिकाच या रोडवर सुरू असून, सोमवारी (ता. ५) शिरसोली गावापुढे रामदेवाडी हनुमान मंदिरासमोरच सुसाट राँगसाईड कारचालकाने दुचाकीला धडक दिल्याने रफिक हुसेन मेवाती (वय २३) आणि अरबाज जहाँगीर मेवाती (२५, दोघे रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा) यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला तीन दिवस उलटत नाही, तोवर गुरुवारी (ता. ८) शिरसोली गावाजवळच दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन मेहरुणच्या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी अपघात झाला असून, हा मार्ग आता मृत्यूचा महामार्ग झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.