Khandoba Maharaj Yatrotsav : खंडोबा महाराजांचा उद्या यात्रोत्सव; भाविकांच्या उत्साहाला उधाण

Khanderao Maharaj temple
Khanderao Maharaj temple esakal
Updated on

Khandoba Maharaj Yatrotsav : काकणबर्डीच्या खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव सोमवारी (ता. १८) होत असून, तालुक्यातील विविध यात्रांमधील हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.(yatrotsav of Khandoba Maharaj from tomorrow in jalgaon news)

पाचोरा - गिरड रस्त्यावर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात खंडोबाचे ऐतिहासिक व जागृत देवस्थान असलेली काकणबर्डी आहे. या टेकडीवर खंडोबा महाराजांनी आपल्या दुसऱ्या विवाहानंतरचे धार्मिक विधी केले व विवाहप्रसंगी हातावर बांधलेले काकण सोडले म्हणून या टेकडीला काकणबर्डी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.

येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्ठीला यात्रा भरते. यात्रेव्यतिरिक्तही इतर रविवारी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भंडारा उधळत भाविक मोठ्या संख्येने येतात. नवस मानतात व नवस फेडतात. भाविकांकडून 'जय मल्हार'च्या गजरात हळद- खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलली जाते. आरती व सदानंदाचा येळकोट- येळकोटचा गजर करून भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढविला जातो.

यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा असून, राज्यभरातून भाविक दर्शनास येतात. या टेकडीवर प्रथम लहानसे मंदिर होते. भाविकांनी श्रद्धेतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दानशूर व भाविकांच्या योगदानातून देखणे टुमदार मंदिर साकारले आहे. टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात आली असल्याने यात्रेसह दर रविवारी येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

Khanderao Maharaj temple
Khanderao Maharaj Yatrotsav : शिरपूरला आजपासून खंडेराव महाराज यात्रोत्सव

खंडोबा महाराजांना हळद व खोबऱ्याचा भंडारा उधळून पूजा करण्याची प्रथा असून, सदानंदाचा येळकोटाचा गजर करून बाजरीची भाकर, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत यांचा नैवेद्य दिला जातो. यात्रोत्सवात विविध वस्तू, खाद्यपदार्थ, खेळणी विक्रीची व मिठाईची दुकाने तसेच लहान मोठे पाळणे लावले जातात.

टेकडीवर बसून कांदा मिरचीची भजी, गुळाची जिलेबी व रेवड्या खाण्याचा आनंद भाविक लुुटतात. यात्रेनिमित्ताने राज्यभरातील नामवंत तमाशा मंडळेही हजेरी लावतात. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. ओझर व गिरड ग्रामपंचायत तसेच पाचोरा पोलिस ठाण्याच्या वतीने सुरक्षा व सुविधेचे नियोजन केले जाते.

पर्यटन स्थळ म्हणून होणार विकास

काकणबर्डी परिसरात भाविक व पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेउन आमदार किशोर पाटील यांनी या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविक, पर्यटकांना सर्व सुखसुविधा मिळाव्या, यासाठी १७ कोटींचा विकास निधी मंजूर करून घेतल्याने येत्या काही दिवसांत पर्यटनस्थळ म्हणून काकणबर्डी परिसराचा विकास झालेला दिसेल. १७ कोटी रुपये निधीतून पर्यटन विकासाची पाच कोटींची कामे, पाच कोटी रूपये खर्चाचे क्रीडा संकुल व सात कोटी रूपये खर्च करून सामाजिक वनीकरण विभागाची विकासकामे होणार आहेत.

Khanderao Maharaj temple
Kanhayalal Maharaj Yatrotsav : शुक्रवारी 3 लाख भाविकांकडून दर्शन; आमळी यात्रोत्सवात 10 कोटींची उलाढाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.