Jalgaon News : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची तब्बल 7 लाख 60 हजारांत फसवणूक

cyber crime
cyber crime esakal
Updated on

जळगाव : व्यक्तिक कर्जाचे आमीष देत मंगरुळ (ता. अमळनेर) येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

मिलिंद प्रकाश पाटील (वय २३, ह.मु. हिंजेवाडी, पुणे) याला बुधवारी (ता. १८ ) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यात पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड लोन देत असल्याचे बतावणी करण्यात आली. (Young man cheated of about Seven lakh sixty thousand lure of giving a loan case has been registered against suspect in cyber police Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

cyber crime
Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

मिलिंद पाटिल याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरच्या आधारे तरुणाच्या नावाने आलेले लोनची रक्कम आणि त्याच्या खात्यातील रक्कम, अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेला परस्पर ऑनलाईन परस्पर खात्यातून लंपास करून फसवणूक केली.

सायबर पोलिसांत गुन्हा

खात्यातून रक्कम लंपास झाल्याची माहिती कळाल्यावर शुक्रवारी (ता. २०) दुपारी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी नंबरधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

cyber crime
Nashik News : पहिल्या टप्प्यात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन; 35 ठिकाणी निधी उपलब्ध होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.