स्पर्धा परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने घेतला गळफास

पीएसआय होण्याचे त्याचे स्वप्न होते.
suicide
suicide esakal
Updated on

जळगाव : शहरातील आहुजानगर परिसरात बहिणीकडे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. महेंद्र देवीदास पाटील (वय २२, रा. आनोरे, ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी महेंद्रने लिहलेल्या चिठ्ठीत नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Young man committed suicide after getting low marks in the MPSC examination)

आनोरे (ता. अमळनेर) गावातील महेंद्र पाटील हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजानगरात बहिण भारती व मेव्हणे हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. २२ मे रोजी महेंद्र याची बहिण व मेव्हणे आनोरे गावात लग्नाला गेले होते. महेंद्र यास त्याची बहिणी भारती यांनी मंगळवारी फोन केला. मात्र, त्याचा फोन बिझी असल्याने संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे भारती बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होत्या, फोन लागतच नाही म्हटल्यावर भारती यांनी जळगावातील त्यांचे शेजारी यांना खात्री करण्यास सांगितले. शेजारी घरी गेले असता, दरवाजा आतून लावलेला होता, दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी संपर्क केला.

suicide
‘म्हाडा’ पेपरफूट प्रकरणाचे जळगावात ‘खोदकाम’

पोलिसांनी मृतदेह उतरवला

घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरिक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असतात महेंद्र हा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानुसार दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला व जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.

आयुष्याचा गोल अपूर्णच

आईवडील देवासारखे आहे, जीवन गोल आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. माझा गोल वेगळा आहे पण माझ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असा मजकूर लिहून शेवटी महेंद्र याने आईवडिलांचे आभार मानले आहेत. महेंद्रने लिहलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली.

suicide
ऐकाव ते नवलच...! पठ्ठ्याला तब्बल 13 वेळा झालाय सर्पदंश

अधिकारी होण्याचे स्वप्न

महेंद्रने एका खासगी क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला होता. पीएसआय होण्याचे त्याचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी त्याने गृप-डीअंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. तर दुसरीकडे नुकत्याच राज्यसेवेच्या शासनाने जागा जाहीर झाल्या मात्र, त्या कमीच असल्याने महेंद्र नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती, महेंद्रचे मेव्हणे हरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.