Jalgaon Accident News : केलेल्या कामाचा राहिलेला पगार घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी-शिरसाठ (३८, रा. हरिविठ्ठल नगर) जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (ता.२४) हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.
रवींद्र शिरसाठ-मिस्तरी बिल्डींग पेंटर म्हणून कार्यरत होते. आठवडाभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला घेण्यासाठी ते हरिविठ्ठल नगरातून खंडेराव नगरकडे जात होते. (young man died after being hit by train Jalgaon Accident News)
त्या वेळी विश्वकर्मा मंदिरानजीक रेल्वे रुळाजवळ त्यांना धावत्या रेल्वेची धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तेथे पोहचले व पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाईक व मित्र परिवाराची गर्दी झाली होती.
रवींद्र हे वृद्ध आई-वडिलांसह हरिविठ्ठल नगरमध्ये राहत होते. त्यांना तीन विवाहीत बहिणी आहे. घरातील रवींद्र हेच कर्ते व्यक्ती होते.
घरकाम करून आई कुटुंबाला हातभार लावत होती. मात्र आता एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यु झाल्याने वृद्ध आई-वडिलांचा आधार हरपला असून अपघाताच्या धक्क्याने दोघेही सुन्न झाले होते.
सलग दुसरा अपघात
कालच बळीराम मराठे यांचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला दिवस उलटत नाही तोच रविवारी पुन्हा एक घटना घडली असून रविंद्र शिरसाठ यांचा अपघाती मृत्यू ओढवला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.