Jalgaon News : शेताच्या तारकुंपणात वीज सोडल्याने तरुणाचा मृत्यू; नशिराबाद ग्रामस्थांचा दांगडो

Death
Deathesakal
Updated on

Jalgaon News : गटार साफ करताना वीजप्रवाह असलेल्या तारकुंपणाला स्पर्श होऊन विजेचा जोरदार धक्का लागल्याने विशाल गोपी चिरावंडे (वय २६, रा. नशिराबाद) या सफाई कामगाराचा मृत्यू मंगळवारी झाला.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नफ्याने शेत करणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करून जखमी केले. मारहाणीसह यात परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (young man died due to electric shock in wire fence of farm jalgaon news)

तालुक्यातील नशिराबाद येथील विशाल चिरावंडे हे गेल्या दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायतीमध्ये कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. नशिराबाद गावाजवळील दिलीप शांताराम कुळकर्णी यांचे शेत असून, त्यांचे शेत सोपान विठोबा वाणी यांनी नफ्याने करण्यासाठी घेतले आहे.

वाणी यांनी शेताला तारांचे कुंपण केले असून, त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला आहे. याच कुंपणाला लागून मंगळवारी (ता. ५) सकाळी आठला विशाल चिरावंडे गटारीचे काम करीत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death
Jalgaon Bribe Crime : अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना दोघांना अटक

तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतकऱ्यावर गुन्हा

शेत नफ्याने करत असलेल्या सोपान वाणी याने शेताच्या बांधाला लाकडी पोल ठोकून त्यांना तारांचे कुंपण करून त्यात वीजप्रवाह सोडला होता. विजेचा धक्का लागून इतरांचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असताना वीजप्रवाह बंद न केल्यामुळे सफाई कामगार विशाल चिरावंडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार सोपान वाणी याच्याविरुद्ध (कलम ३०४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीची तक्रार

गटार साफ करताना विशाल चिरावंडे या मजुराचा मृत्यूला जबाबदार समजून सोपान वाणी या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण करून जखमी केले. वाणी यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Death
Jayant Patil News : लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य.... जयंत पाटील यांचे एकनाथ खडसेंना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.