Jalgaon News : बांभोरी येथील तरूणाचा नदीपात्रात कुऱ्हाडीने खुन; वाळूच्या वादातून हत्त्या झाल्याची चर्चा

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon News : बांभोरी येथील गिरणा नदीच्या पात्रात शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास कुऱ्हाडीने घाव घालून तरूणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मृतदेह तपासणीसाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.

आशीष प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. बांभोरी) असे मृत तरूणाचे नाव असून, वाळू व्यवसायातील वादातून ही हत्या झाल्याचा कयास लावला जात आहे.

आशिष हा नदीपात्रात शौचास गेला असता, हल्लेखोरनी कुऱ्हाडीने वार करून त्याचा निर्घृण खून केला. बराच वेळ परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता, नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. (young man from Bambhori Ax murder in riverbed Talk of killings due to sand disputes Jalgaon Crime News)

पोलिस ताफा दाखल

तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीची चक्रे फिरविण्यास प्रारंभ केला आहे. तर, आशिषची क्रूर हत्या नेमकी कशामुळे झाली, याचा तपास सुरू आहे.

आशिषच्या भयंकर मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. २४) जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आशिषच्या मागे आई-वडील, मोठा भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Darshana Murder Case: 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...', संशयास्पद मृत्यू झालेल्या दर्शना पवारचं 'ते' शेवटंच भाषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()