Jalgaon Accident News : नांद्रा येथील तरुणाचा पुण्यात अपघातात मृत्यू

deepak jadhav
deepak jadhav esakal
Updated on

Jalgaon Accident News : येथील बॅन्डचा व्यवसाय बंद करुन उदरनिर्वाहासाठी पुणे येथे आपल्या भावडांसह गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा पुणे येथे अपघातात जखमी झाल्यानंतर आज उपचार सुरु असताना सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला.

त्याच्यावर शनिवारी (ता. १६) नांद्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(young man from nandra died in accident in Pune jalgaon news)

याबाबत माहिती अशी, येथील मातंग समाजात नावलौकीक मिळवलेल्या जाधव कुटुंबातील राजू भिका जाधव व सुकदेव भिका जाधव या दोन्ही भावांनी बॅन्ड व्यवसाय सुरु केला होता. लहान भाऊ सुकदेव जाधव यांनी स्वतः ‘ओम साईराम बॅन्ड’ या नावाने नवीन गाडी तयार केली होती.

मात्र, बॅंड व्यवसायात स्पर्धा निर्माण झाल्याने कोरोना काळापासून व्यवसाय अडचणीत आला होता. राजू यांना तीन मुले तर सुकदेव जाधव यांना दोन मुले आहेत. राजू जाधव यांचा मोठा मुलगा सैन्य दलात आहे. गावात बॅन्ड व्यवसाय चालत नसल्याने दोन्ही भावांनी आपल्या चारही मुलांना पुण्यात उदरनिर्वाहासाठी तीन महिन्यांपूर्वीच पाठवले होते.

deepak jadhav
Jalgaon Crime News : पाचोऱ्याचा गौरव पाटील ‘एटीएस’च्या कोठडीत

त्यांना पुण्यात कंपनीत कामही मिळाले होते. मंगळवारी (ता. १२) सकाळी सातच्या सुमारास ‘पीओजी’ कंपनीत जाण्यासाठी दीपक जाधव, गोकूळ जाधव व गजानन जाधव हे तिघे रस्त्याच्या बाजूने जात असताना मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने दीपकला जोरदार धडक दिली. ज्यात दीपक गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. दीपक हा हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा होता. संपूर्ण जाधव कुटुंब होतकरू कुटुंब म्हणून परिसरात ओळखले जाते. दीपकचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

deepak jadhav
Jalgaon Crime News : पत्नीचा छळ करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.