अखेर पत्नीचा संशय ठरला खरा

भिकन परदेशी, विठ्ठल परदेशी
भिकन परदेशी, विठ्ठल परदेशी esakal
Updated on

जळगाव : ‘..त्या दिवशी भिकन याच्यासोबतच ते (पती) गेले..अन् त्याच्यावरच माझा संशय आहे’, असे वारंवार पोलिसांना सांगणाऱ्या आशा तळेले यांचा संशय अखेर खरा ठरला आहे. भिकन आणि विठ्ठल या दोघांनीच अपहरणानंतर हत्या करून भूषणचा मृतदेह मध्य प्रदेशच्या जंगलात पुरला. तब्बल पावणेदोन महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला असून, मृतदेह दिसताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

भूषण जयराम तळेले (वय ३०, रा.रायपूर कंडारी) चटई कंपनीत कामावर असल्याने ते मूळ गाव सोडून येथे स्थलांतरित झाले. १७ एप्रिलला भूषण तळेले बेपत्ता झाल्यावर शोध घेऊन तिसऱ्या दिवशी पत्नी आशा तळेले यांनी (२० एप्रिल) पोलिसात हरविल्याची तक्रार दिली. सहाय्यक फौजदार गफूर तडवी, सिद्धार्थ डापकर यांनी तपास करताना आशा यांच्या सांगण्यानुसार, पती भूषण त्या दिवशी भिकन श्‍यामसिंग परदेशी याच्यासोबत दिसले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे आशा वारंवार सांगत होत्या. त्यामुळे भिकन परदेशी व त्याचा साथीदार विठ्ठल परदेशी यांना पेालिसांनी चौकशीला बोलावले. मात्र, आम्हीच त्याला शोधतोय, असे सांगत ते निसटून जायचे.

अनोळखी व्यक्तींचे फोन

आशा पोलिस ठाण्यातून परतली की तिला अनोळखी फोन येत असत. असाच एक पुण्यातून फोन आला. संबंधिताने तुमचा नवरा भूषण तळेले मला पुणे रेल्वेस्थानकावर भेटला व त्याने माझा मोबाईल घेऊन फोन लावला. मात्र, तुम्ही उचलत नसल्याने तो निघून गेला. असे सांगणारा पोलिसांनी शोधून काढला. त्याला विचारपूस केल्यावर तो अटकेतील संशयित भिकनचा नातेवाईक निघाला. भिकनकडे असलेल्या निनावी सीमकार्डवरून तो अनोळखी व्यक्तींना आशाबाईच्या मोबाईलवर फोन करायला लावत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

विठ्ठल-भिकन पडले खोटे

पोलिसांनी आठव्यांदा संशयित भिकन व त्याचा साथीदार विठ्ठल या दोघांना बोलावणे केले. दोघांची वेगवेगळी विचारपूस सुरू झाली. घटनेच्या दिवशी मी औरंगाबादला असल्याचे एकाने सांगितले. दुसऱ्यानेही तीच री ओढली. मात्र, औरंगाबाद जाण्याचा मार्ग वेगवेगळा सांगताच निरीक्षक प्रताप शिकारे यांनी दोघांचा यथेच्छ पाहुणचार केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

जंगालतून मृतदेह ताब्यात

अटकेतील दोघांना घेत उपनिरीक्षक अनिस शेख, गफूर तडवी, सिद्धार्थ डापकर, सुधीर साळवे यांचे पथक मध्य प्रदेशात दाखल झाले. झांझर (ता. नेपानगर) जवळील दाट जंगलवाटेत नेऊन भूषण तळेले यांचा मृतदेह पुरण्यात आला होता. संशयितांनी घटनास्थळ दाखविल्यानंतर सरकारी पंचासमक्ष खोदकाम सुरू झाले. खोदकाम करताना भूषणच्या अंगावरील कपडे दिसताच मृताची आई, पत्नी आशा व चिमुरड्या मुलांनी एकच हंबरडा फोडला.

भिकन परदेशी, विठ्ठल परदेशी
जळगावातून अपहरणानंतर तरुणाचा मध्यप्रेदशात खुन

भिकनची वाईट नजर

मृत भूषणच्या कंपनीत पूर्वी ठेकेदार असलेला भिकन परदेशी याची आशावर वाईट नजर होती. भूषण बेपत्ता झाल्यावर आशाबाई आपल्या तावडीत सापडेल, या अपेक्षेतून त्यानेच आशाला सासरहून बोलावून घेतले. ‘तू इथंच राहा माझ्याजवळ. तुझा नवरा परत येणार आहे. तू निघून गेली, तर मी आत्महत्या करून चिठ्ठीत तुझे नाव लिहून जाईल’, अशी धमकी दिल्यापासून आशा सावध झाली होती. तिने पेालिसांना हा किस्सा सांगितल्यावर पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपाचक्रे फिरवली.

भिकन परदेशी, विठ्ठल परदेशी
दारू पाजून दगडाने ठेचत तरुणाची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.