वीज तारांनी घेतला तरुणाचा बळी; अभियंत्यासह वायरमन विरोधात गुन्हा

हा तरुण दररोज सकाळी बकऱ्यांना चारा आणायचा.
Death
Death esakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथे बकऱ्यांना चारा काढण्यासाठी शेतात गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा लिंबाच्या झाडातून गेलेल्या वीज तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) घडली. वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी महावितरणच्या अभियंत्यासह वायरमनच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथील नितीन बळवंत महाजन (वय २५) हा तरुण दररोज सकाळी बकऱ्यांना चारा आणायचा. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे तो गणेश देसले यांच्या शेतात बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गेला असता, पाटचारीत विजेच्या तारेजवळ मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती कळताच नितीनच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नितीनच्या उजव्या हातात विजेची तार दिसून आली तर आजूबाजूच्या खांबांवरील वीज तारा लोंबकळत अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तेथील वीज पुरवठा खंडित केला.

Death
पती- पत्नीच्या वादात हस्तक्षेप केल्याने मुलाकडून बापाचा खून


वीज कंपनीचे दुर्लक्ष

गणेश देसले यांच्या शेतात ज्या वीज खांबावरील तारा तुटून लोंबकळत होत्या, त्यातील एक तार चाळीसगाव- मालेगाव रस्ता क्रॉसिंगवरून गेली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी उसाच्या गाडीचा धक्का लागून ती तुटली होती. याबाबत महावितरणच्या कार्यालयाला ग्रामस्थांनी कळवले होते. मात्र, त्याची दखलच कोणी घेतली नाही. परिणामी, या तारा तशाच लोंबकळत राहिल्या. बुधवारी (ता. ८) या भागात वादळी पाऊस झाल्याने विजेच्या खांब्यावरील शॉकल (चिनी वाटी) तुटल्याने आर्थिंगच्या तारेत विद्युत पुरवठा उतरून त्याचा तारेचा नितीनला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. वीज कंपनीने केलेल्या दुर्लक्षामुळेच नितीनचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत मृत नितीनचा भाऊ राहुल बळवंत महाजन याने दिल्यावरून मेहुणबारे पोलिसात संबंधित अभियंत्यासह वायरमन विकास वसंतराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Death
ट्रॅफिक कंट्रोल न करता पोलिसांची वसुली : आमदार संजय सावकारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.