Jalgaon News : हर्नियाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला दिलासा; GMC मध्ये वैद्यकीय पथकाला यश

Jalgaon: While bidding farewell to the patient who was cured of hernia disease, Dr. Girish Thakur etc.
Jalgaon: While bidding farewell to the patient who was cured of hernia disease, Dr. Girish Thakur etc.esakal
Updated on

Jalgaon News : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दुर्बिणीद्वारे अवघड असलेली हर्नियाची शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभागात यशस्वीपणे झाली.

दुर्बिणीद्वारे आधुनिक पद्धतीने बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले. (Young man relieved by needleless hernia surgery Success to medical team at GMC Jalgaon News)

जळगाव शहरातील सागर बाविस्कर याला लहानपणापासून हर्नियाचा आजार होता. त्यामुळे त्याला चालताना त्रास होत होता. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आर्थिक परिस्थिती व चिरा मारून शस्त्रक्रिया करण्याची भीती यामुळे सागरची तयारी होत नव्हती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होते, अशी माहिती त्याला मिळाली. त्याने तत्काळ शासकीय रुग्णालयात येऊन शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली. तेथे वैद्यकीय पथकाने दिलासा देऊन शस्त्रक्रिया मोफत होईल, असे सांगितल्यावर त्याला आनंद झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: While bidding farewell to the patient who was cured of hernia disease, Dr. Girish Thakur etc.
Jalgaon NMU News : ‘उमवि’ क्षेत्रातील 39 महाविद्यालये ‘ए’ श्रेणीत; विद्यापीठाकडून अंकेक्षण जाहीर

शल्यचिकित्सा विभागात वैद्यकीय पथकाने सर्व तपासण्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करून घेतल्या. त्यानंतर आधुनिक पद्धतीने दुर्बिणद्वारे हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया बिनाटाक्याची असते.

यात आधुनिक पद्धतीच्या जाळीचा वापर केला जातो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला शस्त्रक्रियाच्या जागी दुखणे अत्यंत कमी असते, ही पद्धत मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात केली जाते. शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे, सहयोगी प्रा. डॉ. प्रशांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रा. डॉ मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, वरिष्ठ निवासी डॉ. ईश्वरी गारसे, कनिष्ठ निवासी डॉ. स्नेहा वाडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. झिया उलहक, परिचारिका सुरेखा महाजन, परिचारिका नीला जोशी यांनी परिश्रम घेतले.

Jalgaon: While bidding farewell to the patient who was cured of hernia disease, Dr. Girish Thakur etc.
Mumbai Crime News: धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागितल्याने हत्या; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.