Jalgaon Crime News: ऐनपूर येथील तरुणाची निघृण हत्या; निंबोल शेतशिवारातील घटना

Sheikh Afzal Sheikh Aslam
Sheikh Afzal Sheikh Aslam
Updated on

Jalgaon Crime News : रावेर तालुक्यातील निंबोल शेतशिवारात ऐनपूर येथील रहिवासी शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय २७) याची डोक्यात दगड मारून निघृण हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता. १४) दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young man was murdered by hitting head with stone jalgaon crime news)

मृत तरुण दुपारी तीनच्या सुमारास शेतात जात आहे, असे सांगून घरून निघाला होता. मात्र दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास त्याचा ऐनपूर- निंबोल दरम्यान निंबोल शिवारात गायरान जमिनीच्या रस्त्यांवर त्याचा मृतदेह आढळला होता. विशेष म्हणजे ज्या रस्त्यांवर त्याचा मृतदेह आढळला त्या रस्त्यावर त्याचे शेतही आहे.

शेतशिवारात आसलेला हा गायरान जमिनीचा भाग हा एकीकडे आल्यामुळे या भागात जास्त लोकांचा वर्दळ नसते. शेतात जात असताना त्याच्याकडे मित्राची बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी (एमएच १९, डीएल ६४९५) होती. तसेच मृतदेहाजवळ एका भलामोठा दगडही आढळला. त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे, हे सध्या सामोर आले नाही. पोलिस याचा युद्धपातळीवर तपास करीत आहेत.

दरम्यान, तीन ते चार वर्षांतील निंबोल परिसरात हा दुसरा खून असून या आधी बँक ऑफ बडोदा येथील मॅनेजरचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याचा तपास लावण्यातही पोलिसांना अपयश आले होते. या खुनामुळे पुन्हा परीसर हादरला आहे. शेख अफजल हा म्हशी विक्रीचा व्यवसाय करून शेती करत होता.

Sheikh Afzal Sheikh Aslam
Jalgaon Bribe Crime: जिल्हा कारागृहात सुभेदारासह दोघा महिलांना लाच घेताना पोलिसांना अटक; धुळे ‘एसीबी’ची कारवाई

त्याची घरची परिस्थिती जेमतेम आहे. शांत आणि संयमी अशी त्याची ओळख होती. त्याचा खून झाला, तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब हे द्वारदर्शनावर मलकापूर येथे गेले होते. मी गुरांना औषधी घेण्यासाठी जात असल्याचे सांगत तो घरून निघाला. परंतु घरी आलाच नाही.

वडिलांनीही फोन केला. परंतु फोन उचलत नाही म्हणून वडिलांनी छोट्या भावाकडे फोन करून विचारणा केली. छोटा भाऊ शेख फारुक हा त्याच्या शोधात शेती शिवाराकडे त्याच्या शोध घेण्यासाठी निघाला तेव्हा तेव्हा अफजलचा मृतदेह त्याला आढळून आला.

पोलिसांपुढे आरोपींना शोधण्याचे आव्हान

जळगाव येथून रात्री आठच्या दरम्यान मृतदेहाजवळ श्‍वानपथक दाखल झाले. त्यांनी व पोलिसांनी मिळून आरोपीचा शोध घेतला. घटनास्थळी फैजपूर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनावणे, निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, तसेच रावेर, निंभोरा व इतर पोलिस कर्मचारी, तसेच जळगाव येथून फॉरेन्सिक टीम यांनी तपास केला रात्री उशिरा मृतदेहाचा पंचमाना करून शवविच्छेदन रावेर येथे करण्यात आले.

मृतदेह सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या बाबत निंभोरा पोलिस ठाण्यात फिरोज खान मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ तपास करीत आहेत.

Sheikh Afzal Sheikh Aslam
Jalgaon Crime News: वावडदा शिवारात मध्यरात्री रखवालदाराच्या हत्येचा थरार; निर्घृण खून करून ट्रॅक्टर चोरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.