Jalgaon News : दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना म्हसले (ता. अमळनेर) येथे मंगळवारी (ता. २३) दुपारी घडली.
याप्रकरणी पाच जणांविरूद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young man was robbed by putting chilli powder in his eyes jalgaon crime news)
राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय ३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण) हा सेंट्रिंग कामाची ठेकेदारी करतो. अमळनेर येथे त्याच्या घरी जाण्यासाठी मंगळवारी (ता. २३) दुपारी बारानंतर निघाला होता. त्याच्यासोबत अमळनेर येथील प्लॉट व्यवहाराचे दोन लाख रुपये होते. परत येताना त्याच्या पत्नीलाही तो सोबत घेऊन येणार होता.
जळगावहून धरणगावमार्गे दुचाकीने (एक्टिव्हा : एमएच १९, डीएच ६८४०) निघाल्यावर धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यांत तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्याची एक्टिवा आणि त्याच्याजवळील दोन लाख रुपये घेऊन पसार झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काही वेळाने नागरिक आल्यावर त्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत रुग्णालयात जाऊन माहिती घेतली आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, घटनेबद्दल एलसीबीचे पथक देखील माहिती घेत असून, दरोडेखोरांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत राजेंद्र गुलाब चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल गुलाब चौधरी (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) याच्यासह चार जणांवर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.