Amalner Marathi Sahitya Sammelan : बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रम सादरीकरणात स्वरचित काव्यवाचन

स्वरचित कवितेतून ओवी तुषार चांदवडकरसारख्या नवबालकवयित्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Amalner Marathi Sahitya Sammelan
Amalner Marathi Sahitya Sammelan esakal
Updated on

Amalner Marathi Sahitya Sammelan : ‘स्वातंत्र्य, समतेच्या लढ्यासाठी गुरुजी झुंजले... बलसागर भारतासाठी उभी केली धडपडणारी मुले... गुरुजींची श्यामची आई आहे गीताई... मायलेकाचा महिमा सांगे ती अंगाई... अशी माऊली होऊन गेली... हा वाटे चमत्कार, ‘गुरुजी होते महाराष्ट्राला घडलेला साक्षात्कार...’ या स्वरचित कवितेतून ओवी तुषार चांदवडकरसारख्या नवबालकवयित्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

जणू काही साने गुरुजींची लेकरेच साने गुरुजींच्या रूपाने काव्यवाचन करीत असल्याचा आभास निर्माण झाला.(young poets spock poetry in selected program presentation at Bal Melava amalner jalgaon news)

खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर शुक्रवारी (ता. २) बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड अध्यक्षस्थानी होते.

या वेळी लेखक कवी विलास संदगीकर, मराठी वाङ्‍मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, बाल स्वागताध्यक्षा दिशा सरदार, उद्‍घाटक पीयुषा जाधव आदी उपस्थित होते. कथाकथन सत्रात एकूण सहा कथाकथनातून आकांक्षा पाटील व गार्गी जोशी या गुणी विद्यार्थिनींनी कथा कथन केल्या.

काव्यवाचन सत्रात एकूण नऊ काव्यवाचनातून ओवी चांदवडकर व प्रांजल अमोल सोनवणे (शिरपूर) यांनी आपल्या कविता सादर केल्या. नाट्यप्रवेश सत्रात एकूण सात नाट्यप्रवेशातून संस्कृती पवनीकर (जळगाव) व शारदा माध्यमिक विद्यालय (कळमसरे)च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नाट्यछटा सादर केल्या.

यानंतर पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘बलसागर भारत होवो’ हे साने गुरुजींचे गीत सादर केले. या वेळी बालसाहित्यातील या वर्षाचा भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Amalner Marathi Sahitya Sammelan
Jalgaon News : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची चाळीसगावला भेट

संदीप घोरपडे, भय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, प्रा. धर्माधिकारी, गिरीश चौक, भाऊसाहेब देशमुख, ॲड. सारांश सोनार आदींसह मराठी वाङ्‌मय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

संमेलनात अमरस्वर पुस्तकाचे प्रकाशन

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी (अमळनेर), ता. २ : येथे शुक्रवार (ता.२) पासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ कट्ट्यावर दुपारी तीन वाजेच्या सुमाराला चोपडा येथील कवी व लेखक साहित्यिक रमेश जे. पाटील यांच्या पाचव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रा. वा. ना आंधळे.

ज्येष्ठ कवी कृष्णा पाटील, प्रशांत पब्लिकेशनचे रंगराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी कार्यवाह नरेंद्र निकुंभ मसप सदस्य छोटू वार्डे चोपडा येथील कवी एस. टी. कुलकर्णी, डॉ. मनीषा पाटील, कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Amalner Marathi Sahitya Sammelan
Amalner Marathi Sahitya Sammelan : गुलाबी थंडीत काव्य मैफलीने आणली रंगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.