Jalgaon Crime : द्रौपदीनगरातील तरूणीला कुरिअर कंपनीचे नाव सांगून पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची बतावणी करत तब्बल ३ लाख २६ हजार ८७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Young woman fraud under drug parcel Jalgaon Crime)
संबंधीत ३२ वर्षिय तरूणी खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करते. शनिवारी (ता. ९) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास त्यांना मोबाईलवरून संपर्क साधत फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने अंधेरी (मुंबई) येथून तैवान येथे एक पार्सल आल्याचे सांगण्यात आले.
या पार्सलमध्ये क्रेडीट कार्ड, पासपोर्ट, ड्रग्ज असल्याचे खोटे सांगून संबंधीताने कथित सायबर क्राईमशी बोलणे करून दिले. त्यावेळी तरूणीकडून बँकेची माहिती विचारून घेत बँक खात्यातून ३ लाख २६ हजार ८७ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.