Jalgaon Crime : तक्रार घेऊन आला अन्‌ व्हीडीओ व्हायरल केला; तरूणास चोप

Beating News
Beating Newsesakal
Updated on

Jalgaon Crime : गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या एका बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीकडे तक्रार घेवून आलेल्या ग्राहकाने तिचा व्हीडीओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. ६) दुपारी उघडकीस आला.

हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधीत तरूणाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. शौकत अली अब्दुल गफार शख (वय ४२, रा. कासमवाडी, ह. मु. जिल्हापेठ) असे या तरूणाचे नाव असून, त्याच्याविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (youth beaten up for viraling girl video jalgaon crime news)

बुधवारी दुपारच्या सुमारास संबंधीत तरुणी बँकेत काम करीत असताना शौकतअली त्या ठिकाणी आला. बँक खात्यातून वर्ग केलेले पैसे समोरच्या पार्टीला मिळाले नसल्याची तक्रार त्याने तरुणीकडे केली. तरुणीने ती तक्रार सेल्स ऑफिसर वसीम बागवान यांच्याकडे वर्ग केली. त्यानंतर शौकतअली याने वसीम बागवान यांच्याशी बोलत असतानाच मोबाईल कॅमेऱ्याद्वारे तरुणीचा व्हीडीओ तयार केला.

ही बाब तरुणीच्या लक्षात येताच तिने त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने व्हीडीओ तत्काळ डिलीट करुन टाकला. मात्र, तत्पुर्वी त्याने व्हीडीओ एकाला पाठविला होता. त्यामुळे काही तरूणांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, शौकतअली हा तरूणीला त्रास देत असल्याचे समजले. या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्या भावाला ही माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beating News
Jalgaon Crime News : भांडणातून घर जाळणाऱ्या एकाला 6 वर्षांची शिक्षा

त्यानंतर तरुणीचा भाऊ आणि त्याचे मित्र बँकेत आले. त्यावेळी तरुणीने शौकतअली हा विनाकारण त्रास देत असल्याचे सांगताच उपस्थित नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी गजानन बडगुजर घटनास्थळी पोहचले.

त्यांनी जमावाच्या तावडीतून शौकतअलीची सुटका करीत त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन शौकतअली अब्दुल गफ्फार शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beating News
Crime News: नात्यानं भाऊ असणाऱ्या ६ जणांचा 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.