Jalgaon Accident News : ॲपेरिक्षाच्या धडकेत एकुलता भाऊ ठार; तीन बहिणींच्या राखीचा धागा तुटला...

youth died in ape rickshaw accident with two wheeler
youth died in ape rickshaw accident with two wheeleresakal
Updated on

Jalgaon Accident News : कानळदा गावाजवळ शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीला मालवाहू ॲपेरिक्षाने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण ठार झाला.

कपिल अशोक सपकाळे (वय २४, रा. कठोरा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तीन बहिणींचा एकुलता भाऊ ठार झाल्याने कुटुंबीयांसह नातेवाइकांनी आक्रोश केला. (youth died in ape rickshaw accident with two wheeler)

कठोरा (ता. जळगाव) येथे कपिल सपकाळे आईवडिलांसमवेत वास्तव्याला होता. जळगाव शहरात खासगी नोकरी करून तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कपिल दुचाकी (एमएच १९, एजे ६२८४)वरून कानळदामार्गे कठोरा येथे जाण्यासाठी निघाला. कानळदा गावाजवळ एका अज्ञात मालवाहू ॲपेरिक्षा (एमएच १९, एस ७९००)ने समोरून त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत कपिल जागीच ठार झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तालुका पोलिसांना घटना कळवली व रुग्णवाहिकेतून तरुणाचा मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलविला. तरुणाच्या खिश्‍यातील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

youth died in ape rickshaw accident with two wheeler
Jalgaon Accident News : दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण ठार

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मालवाहू रिक्षा ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा तालुका पोलिस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त वडील, वयोवृद्ध आई आणि विवाहित तीन बहिणी, असा परिवार आहे. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, वडिलांच्या आजारपणामुळे कपिलवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. तो बहिणींचा लाडका होता. अवघ्या एक महिन्यावर रक्षाबंधनाचा सण असताना, कपिलचा दुदैवी मृत्यू झाल्याने तिघा बहिणींचा हदय पिटवटून टाकणारा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.

youth died in ape rickshaw accident with two wheeler
Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.