Jalgaon Crime News : मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून हाणामारी; युवकाचा मृत्यू

crime news
crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : रवंजा बुद्रुक (ता. एरंडोल) येथे मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत अठरावर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

हाणामारीत जखमी झालेल्या एकावर जळगाव येथे उपचार सुरू असून, एका जखमीसह चार संशयिताना पोलिसांनी अटक केली.

रवंजा बुद्रुक येथे तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (youth died in beating Jalgaon Crime News)

रवंजा बुद्रुक येथे मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून लक्ष्मण माळी आणि सुभाष कोळी यांच्या कुटुंबात वाद होऊन हाणामारी झाली. यामध्ये नामदेव कोळी या अठरावर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर सुनील आणि लक्ष्मण माळी यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्यामुळे ते जखमी झाले.

लक्ष्मण माळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गुरुवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास गावातील नामदेव ऊर्फ रावण अशोक कोळी घरी आला आणि तुमचा मुलगा कुणाल माळी याने शिवीगाळ केली असून, त्यास समजावून सांगा, असे सांगितले. लक्ष्मण माळी यांनी मुलगा कुणाल यास शिवीगाळ का केली, असे विचारले असता नामदेव कोळी यास मला शिवीगाळ करीत असल्याचे वाटले.

त्यानंतर नामदेव कोळी याने पुन्हा शिवीगाळ केली आणि कुणाल माळी यास पाहून घेण्याची धमकी दिली. शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठच्या सुमारास लक्ष्मण माळी बसस्थानकाजवळ उभे असताना त्यांचे भाऊ सुनील माळी बसस्थानकाजवळ स्वत:च्या रिक्षाजवळ उभे होते.

त्याच वेळी नामदेव आणि अक्षय कोळी तेथे आले आणि सुनील माळी यांच्याशी वाद घालू लागले. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे संतप्त नामदेव कोळी याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने सुनील माळी याच्या पोटात वार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Nashik Crime : खळबळजनक! फसवणूक झाल्याच्या कारणावरून भक्ताकडून महिलेचा खून

लक्ष्मण माळी भावाला वाचवण्यासाठी गेले असता त्यांच्या हातावरही वार करून जखमी केले. त्या वेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली असता नामदेव कोळी याने हातातील चाकू त्याच ठिकाणी फेकून शेताकडे पळून गेला.

ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून पकडले व मारहाण केली. ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. याबाबत लक्ष्मण माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव आणि अक्षय कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुभाष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की लक्ष्मण माळी हे आनंदा आणि चेतन माळी यांच्यासह आज सकाळी घरी आले आणि तुझ्या भावाच्या मोटारसायकलचा कट मारल्याचे सांगून वाद घालू लागले आणि नामदेव कोळी कोठे आहे, याबाबत विचारणा करू लागले.

त्या वेळी तिघांच्या हातात लोखंडी अँगल व लोखंडी पाइप होते. सकाळी आठच्या सुमारास लक्ष्मण, आनंदा व चेतन माळी, तसेच नामदेव कोळी यांच्यात वाद झाला.

crime news
Jalgaon Crime News : साप दाखवतो सांगून धरला हात; मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

त्यावेळी नामदेव कोळी याने लक्ष्मण व सुनील माळी यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि शेताकडे पळून गेला. त्या वेळी भय्या कोळी याने त्यास पकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले. त्या वेळी लक्ष्मण माळी, राजू सुकदेव माळी, सुकलाल माळी यांनी नामदेव यास मारहाण केली, तर राजू सुकदेव माळी याने दगड उचलून नामदेव याच्या डोक्यात टाकला.

तसेच भय्या सोनवणे यानेही नामदेव कोळी याची मोटारसायकल पेटवून दिली. नामदेवचे वडील अशोक कोळी, भाऊ प्रवीण कोळी, सुभाष कोळी यांनी नामदेव यास जळगाव येथे शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी करून तो मृत झाल्याचे सांगितले.

याबाबत सुभाष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मण माळी, राजू माळी, सुकलाल माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व उपनिरीक्षक शरद बागल व सहकारी तपास करीत आहेत.

crime news
Dhule Crime News : धुळे हादरले! हातमजूर विवाहितेवर सामूहिक अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.