Jalgaon Accident News : तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Accident
Accidentesakal
Updated on

Jalgaon Accident News : तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.

ही घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री घडली.(Youth dies in car accident jalgaon crime news)

रत्नापिंप्री येथील पांडुरंग मन्साराम पाटील (वय ४०) व चेतन अरूण पाटील (वय १६) हे दोघे मोटारसायकलने धुळ्याकडे जात असताना विचखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चेतन अरुण पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर पांडुरंग मन्साराम पाटील हे गंभीर जखमी झाले.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की अज्ञात वाहन भरधाव वेगाने गाडी चालवत समोरून येणाऱ्या मोटरसायकली धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने चेतन पाटील जागीच ठार झाला तर पांडुरंग पाटील हे गंभीर जखमी झाले.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी पारोळा पोलिसांना कळविल्यानंतर चेतन पाटील यांना पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर पांडुरंग पाटील यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने धुळे रुग्णालयात पाठविण्यात आले.

Accident
Jalgaon Accident News : पायावरुन बसचे चाक गेल्याने भांडी विक्रेत्याचा कापावा लागला पाय; बसस्थानकात झाली दुर्घटना

मृत चेतन पाटील याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. चेतन हा घरचा कर्ता होता. तो शिक्षण सांभाळून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी आई-वडिलांना मोठी मदत करत होता.

चेतनचा अपघातात मृत्यू झाल्याने रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावात शोकाकुल वातावरण होते. अवघ्या सोळा वर्षीय चेतनच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकुल वातावरणात दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पारोळा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Accident
Jalgaon Accident News : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.