Jalgaon News : Valentine's Day साठी तरुणाई होतेय सज्ज; भेटवस्तूंची रेलचेल

Jalgaon: A young woman looking at a greeting card in a shop
Jalgaon: A young woman looking at a greeting card in a shopesakal
Updated on

जळगाव : ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी तरुणाईची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे, कधी आणि कोणते गिफ्ट द्यायचे, याचे आराखडे बांधले जात आहेत.

अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छापत्रे खरेदी करण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या सोयीसाठी बाजारातील अनेक दुकाने लाल, गुलाबी रंगांच्या वस्तूंनी सजली आहेत. (Youth getting ready for Valentine's Day a train of gifts Various Days from today Jalgaon News)

Jalgaon: A young woman looking at a greeting card in a shop
Nashik News : अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी : शरद आहेर

काही वर्षांपासून ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’, ‘चिल्ड्रेन डे’, ‘अर्थ डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाइन डे’, ‘रोझ डे‘, ‘सारी डे’, असे नानाविध ‘डे’ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, आस्था, आवड, वात्सल्य, भक्ती, आदर, ममत्व, असे प्रेमाचे अनेक रंग आहेत. प्रेमीयुगुलांसाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ खास असतो.

‘रोमन’मध्ये पोपने सुरू केला

‘व्हॅलेंटाइन डे’ हा रोमन साम्राज्यात इसवी सन १५०० मध्ये एका पोपने सुरू केला. हा दिवस महाविद्यालयातही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाचे सावट नसल्याने शाळा, महाविद्यालयीन तरुणांमध्ये हा ‘डे’ साजरा करण्याची तयारी सुरू आहे. अनेक तरुण- तरुणी समाजमाध्यमांचा वापर करून आपले प्रेम व्यक्त करतील.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Jalgaon: A young woman looking at a greeting card in a shop
Nashik News : विना कथड्याच्या पुलाला तातडीच्या दुरूस्तीची आस

अर्थातच हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक प्रेमीयुगुलाची आपापली एक वेगवेगळी स्टाइल असते. त्यात ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त साधून कोणाला प्रेमाची कबुली द्यायची असते, तर कोणाला ‘ब्रेकअप’ झाल्यामुळे वेगळ्या अर्थाचे शुभेच्छापत्र द्यायचे असते. अशा प्रत्येक निरनिराळ्या मजकुरांची शुभेच्छा पत्रे बाजारपेठेत आली आहेत. मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार झाला असला, तरी शुभेच्छापत्रांना चांगलीच मागणी आहे, असे नाइन टू नाइन डालर शापीचे नमीष पंचमिया यांनी सांगितले.

विविध दुकाने ‘फ्रेंडशिप बँड', ‘लव्ह आकारातील टेडी बियर’, ‘फोटो फ्रेम’, ‘परफ्यूम’, ‘गोल्डन रोझ’, ‘लव्ह फोटो फ्रेम’, ‘लव्ह बर्ड’, ‘किचन’ आदी निरनिराळ्या भेटवस्तूंनी सजली आहेत. भेटवस्तूंच्या बहुसंख्य दुकानांत अगदी दहा रुपयांपासून हजार रुपयापर्यंतचे विविध धातूंचे, रेशमाचे आकर्षक फ्रेंडशिप बँडने दुकाने सजली आहेत. शुभेच्छापत्रांनाही अधिक मागणी आहे. भेटवस्तूपेक्षांही शुभेच्छापत्रातील शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचणाऱ्या भावना अधिक महत्त्वाच्या असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Jalgaon: A young woman looking at a greeting card in a shop
Nashik News : नाशिककरांना अद्यापही मेट्रो निओची प्रतिक्षाच; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची फाइल हलेना

दिवस ‘तुझे हे फुलायचे’!

- ७ फेब्रुवारी- रोझ डे

- ८ फेब्रुवारी- प्रपोज डे

- ९ फेब्रुवारी- चॉकलेट डे

- १० फेब्रुवारी- टेडी डे

- ११ फेब्रुवारी- प्रॉमिस डे

- १२ फेब्रुवारी- हग डे

- १३ फेब्रुवारी- किस डे

- १४ फेब्रुवारी- व्हॅलेंटाइन डे

Jalgaon: A young woman looking at a greeting card in a shop
Nashik News : टाकेद-धामणगाव रस्त्याच्या कामाला जोमाने सुरवात; आधुनिक DLC प्रणालीवर काँक्रिटीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.