Jalgaon News : येथे काठेवाडी गायी गिरणा काठालगत एका शेतात गायी चरत असताना त्यातील एक गाय शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली.
ही माहिती कळताच शनिभक्त परिवार व गावातील काही तरुणांनी धाव घेत जीवाची पर्वा न करता ७० फूट विहिरीत उतरून गायीला जीवदान दिले. या तरुणांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. (youth saves cow which fell in well jalgaon news )
मेहुणबारे गावाजवळ असलेल्या दसेगाव शिवारात वास्तव्यास असलेल्या काठेवाडींची जनावरे शनिमंदिराजवळील मंगलसिंग राजपूत यांच्या शेताजवळ आली होती. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास एक गाय विजय वाघ यांच्या विहिरीत पडली. या विहिरीत २५ फूट पाणी होते. सुमारे ७० फूट खोल असलेल्या व जमीन लेव्हल असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ही गाय विहिरीत कोसळली.
याबाबत माहिती मिळताच येथील शनिभक्त परिवारातील सदस्य अजित पाटील, दिनेश धनगर व मफा काठेवाडी हे दोरच्या साह्याने विहिरीत उतरले. या वेळी शनिभक्त परिवार व ग्रामस्थांनी देखील धाव घेत गायीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नाने दोरखंड लावून वसंत महाजन यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या गायीला वाचविण्यात यश आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
देव तारी त्याला कोण मारी...
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे शनिमंदिर भागातील किरण घोरपडे यांच्या शेतात बांधावरील गवत कापत असताना त्या बांधावर वीजप्रवाह सुरू असलेली वायर त्यांना दिसली नाही. यात वायर देखील कापली गेली. मात्र विळ्याला लाकडी मूठ असल्याने त्यांना शॉक लागला नाही. हा प्रकार लक्षात येताच एकच धांदल उडाली.
मात्र देव तारी त्याला कोण मारी असे स्वतः अजित पाटील यांच्या तोंडून वाक्य निघाले. याच अजित पाटील यांनी जिवाची पर्वा न करता अशा स्थितीतही विहिरीत पडलेल्या गायीला वाचविण्यासाठी विहिरीत उतरून व गायीला वाचविले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.