Jalgaon News | टोळी युद्धाचा भडका ; जळगावात तरुणाचा चॉपरने भोसकून खून

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जुने बस स्थानकाशेजारील लॉटरी गल्लीत जुगार अड्ड्यावर बसलेल्या तिघा मित्रांवर एकाने धारदार शस्त्राने चढविलेल्या हल्ल्यात तरुणाचा जागीच बळी गेला. अन्य दोघे जखमी झाले आहेत. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा थरार घडला. घटनेनंतर हल्लेखोर स्वत:च पोलिसांत हजर होऊन आपल्यावर चॉपरने हल्ला झाल्याचा दावा करू लागला.

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत जुन्या बसस्थानकाशेजारीच लॉटरी गल्ली आहे. आज (ता. २०) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास किरणशेठ यांच्या जुगार अड्ड्यावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आकाश सुरेश सपकाळे ऊर्फ धडकन, सागर सुरेश सपकाळे (वय २८), सागर आनंदा कोळी (वय २२) असे जुगाराच्या डावात रंगलेले होते. (Youth stabbed to death a chopper in Jalgaon Crime News)

Crime News
Jalgaon Crime News : बिस्मिल्ला चौकात बंद घर फोडले; सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास

एकामागून एक वार

या ठिकाणी गोपाळ कैलास सैंदाणे (वय ३१) व त्याच्यासह इतरांनी अचानक आकाश सपकाळे याच्यावर चॉपरने वार केला. एकामागून एक वार करत त्याला गंभीर केले. सोबतच्या सागर सपकाळे व सागर कोळी यांनाही पाठीवर मांड्यावर वार करून जखमी केले. घटनास्थळावरील लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर आकाशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. इतर दोघे गंभीर आहेत.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

घटनेचे वृत्त कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गवळी, गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील, निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह श्‍वानपथक, फॉरेन्सिक पथके आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळासह जिल्‍हा रुग्णालयात दाखल झाला.

रुग्णालयात तणाव

आकाशचा लहानभाऊ सागर सपकाळे, सोबत सागर कोळी असे तिघेही जैनाबाद-कांचन नगरातील रहिवासी असल्याने परिसरातील मोठ्या प्रमाणावर नातेवाइकांनी जिल्‍हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. हल्लेखोर आणि जखमी दोघांच्या टोळ्यांमध्ये जुनाच वाद असल्याने त्यांच्याच ‘खुन्नस’ मधूनच हा टोळी युद्धाचा भडका उडाल्याने जिल्‍हा रुग्णालयात तणावाचे वातावरण पसरले होते. अप्पर अधीक्षक गवळी यांनी ‍रुग्णालयात भेट दिल्यावर घटनास्थळ आणि जैनाबाद परिसरात कमांडो पथकांना तैनात केले.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Crime News
Jalgaon News : Lions Expoचे थाटात भूमिपूजन! अमळनेर येथे 6 ते 10 जानेवारी दरम्यान आयोजन

‘मलाच मारले...’ म्हणत गोपाळ पोलिस ठाण्यात

साधारण साडेसात वाजेच्या सुमारास गोपाळ कैलास सैंदाणे हा उजव्या हाताला चाकू लागलेल्या अवस्थेत शहर पोलिस ठाण्यात धडकला. मला सोनू सुरेश सपकाळे, बंटी विलास कोळी, सुरेश आनंदा सपकाळे, सागर आनंद सपकाळे अशांनी चॉपरने हल्ला करून जिवेठार मारण्याचा केला. यात स्वत:चा बचाव करीत मी पोलिस ठाण्यात शिरल्याचे तो ठाणे अंमलदाराला सांगू लागला. निरीक्षक ठाकूरवाड यांनी विचारल्यानंतरही गोपाळ या चौघांनीच लॉटरी गल्लीत चाकू मारुन पळ काढला, असे सांगू लागला.

वीस दिवसांपूर्वीच झाला जामीन

एरंडोल येथील सराफा व्यावसायिकावर दरोडा टाकून नऊ लाखांचा ऐवज (१६ फेब्रुवारी) लुटून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आकाश ऊर्फ धडकन अटकेत होता. तो १ डिसेंबर रोजीच जामीनावर सुटला होता. लूटमारसोडून धंदा टाकावा, यासाठी त्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

शवविच्छेदनगृहाच्या दारावर पत्नी बसून

मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मृत आकाशचे याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ सागर, राहुल असा परिवार असून त्याच्यावर चाकूहल्ला झाल्याचे कळताच पत्नी, आई- वडील गल्लीतील प्रेमाचे आप्तस्वकीय रुग्णालयात धडकले. मात्र, आकाशचा मृतदेह विच्छेदन गृहात हलविण्यात आला होता. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने आक्रोश करत विच्छेदनगृहाच्या दारावरच बैठक मारत आताच चेहरा दाखवा असा हट्ट धरला.

Crime News
Jalgaon News | आधारकार्डाला 10 वर्षे झाली असल्यास अद्ययावत करा : जिल्हाधिकारी अमन मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.