Jalgaon Crime News: धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

शहरातील तांबापुरा परिसरात धारदार चॉपर घेऊन दोन जण दहशत माजवीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.
 youth who was walking around with  sharp weapon was arrested Jalgaon Crime News
youth who was walking around with sharp weapon was arrested Jalgaon Crime News
Updated on

Jalgaon Crime News : मेहरुण मधील दोन अट्टल गुन्हेगार धारदारशस्त्र घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी धाव घेत एकाला अटक केली तर, दुसरा फरार झाला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (youth who was walking around with sharp weapon was arrested Jalgaon Crime News)

शहरातील तांबापुरा परिसरात धारदार चॉपर घेऊन दोन जण दहशत माजवीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील ललित नारखेडे व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत तांबापुरा गाठले.

रईस शेख रशीद (वय ३२, रा.तांबापुरा) व शोएब शेख सलीम (रा. जुम्मा शाहा वखारजवळ मेहरुण) असे दोघेही पोलिसांना पाहून पळू लागले.

 youth who was walking around with  sharp weapon was arrested Jalgaon Crime News
Jalgaon Crime News: ॲडव्हान्स परत मिळण्यासाठी डांबले कंपनीच्या कर्मचाऱ्याला; हॉटेलमध्ये 7 दिवस ‘टॉर्चर’

त्यापैकी रईस शेख रशीद हा पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याचा साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरला.

पोलिसांना रईसकडे चॉपर आढळून आले. पोलिस नाईक ललित नारखेडे यांच्या तक्रारीवरून दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

 youth who was walking around with  sharp weapon was arrested Jalgaon Crime News
Jalgaon Crime News: चाळीसगावला अनधिकृत कॅफे उद्ध्वस्त; 6 मुले, मुली आली मिळून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()