Jalgaon News : दहा लाखांची कार फोडणारे अटकेत; सुपारी घेत कार फोडल्याचा संशय

suspect on 2 wheelers & suspect near car
suspect on 2 wheelers & suspect near caresakal
Updated on

जळगाव : शहरातील शिवकॉलनीत प्रदीप पंढरीनाथ राणे यांच्या नवीन कारवर १७ जानेवारीला मध्यरात्री हल्ला झाला होता. गल्लीतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रामानंदनगर पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असून, चार दुचाकींवर आलेल्या सहा संशयितांना अटक केली आहे. (youths on 2 wheelers attacked car parked outside house night cause damage 6 suspects arrested jalgaon crime news)

एका कंपनीत नोकरीला असलेले प्रदीप राणे यांनी २५ डिसेंबर २०२० ला दहा लाखांची नवी कोरी (एमएच १९, इए १११२) कार घेतली. चार दुचाकींवरून आलेल्या सहा तरुणांनी मध्यरात्री घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर हल्ला करून तब्बल पावणेदोन लाखांचे नुकसान करून धूम ठोकली होती.

याबाबत राणे यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाळे, सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, प्रवीण जगदाळे, रवी चौधरी, रेवानंद साळुंखे, सुशील चौधरी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले. त्यावरून पिंप्राळ्यातील एका संशयिताची ओळख पटली.

त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्यात भूषण मनोज अहिरे (वय १९, रा. विद्यानगर), मनीष शशिकांत साळवे (१९, निसर्ग कॉलनी, पिंप्राळा), मयूर शशिकांत तायडे (वय १८), मोनू नंदू अहिरे (वय १८), देवेंद्र नरेंद्र सोनवणे (१८, तिघे रा. रेडक्रॉससमोर, पिंप्राळा), अजय किशोर सोनवणे (१८, हरिविठ्ठलनगर बाजारपट्टा) यांचा समावेश आहे. ताब्यात घेतल्या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

suspect on 2 wheelers & suspect near car
KBCNMU Election : उमवि ‘Senate’वर विद्यापीठ विकास मंचचे वर्चस्व

दुश्मनीतून हल्ल्याचा संशय

प्रदीप राणे राहत असलेल्या कॉलनीत त्यांच्या घराला लागून असलेल्या अतिक्रमित बांधकामाबाबत त्यांचा वाद सुरू आहे. त्यांनी महापालिकेत तक्रारीही केल्या होत्या. त्यावरून एक-दोन वेळेस भांडणही झाले होते. याच भांडणातून पैसे देऊन कार फोडल्याचा पोलिसांना संशय असून, त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस गस्तीचा अभाव

परिसरात रात्रभर भुरटे चोर आणि दुचाकीवर सुसाट पळणारे बाईकर्सचा, टपोरी तरुणांचा वावर वाढला आहे. पोलिसांची गस्तच होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

suspect on 2 wheelers & suspect near car
PM Kisan Yojana : ‘पीएम’ किसान योजनेचा लाभ ‘टपाल’मध्ये मिळणार; राज्यात मोहीम सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.