Jalgaon News : लहान मुले, मधुमेहींसाठी बनवले Zero Suger Choclate

Zero Choclate
Zero Choclateesakal
Updated on

जळगाव : चॉकलेट समोर असताना, ते खाण्याची इच्छा न होणारी व्यक्ती विरळच... मधुमेहींना मात्र रक्तातील साखर वाढू नये, म्हणून चॉकलेट खाण्याची इच्छाच मारावी लागते; पण जळगावच्या युवा उद्योजकाने त्यांच्यासाठीही अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक असे ‘झीरो शूगर चॉकलेट’ उत्पादित केले आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘केसीआयएल’ने त्यांच्या या कल्पनेला मार्गदर्शनाची दिशा दिली आणि या युवा उद्योजकाचे हे प्रॉडक्ट थेट ‘ॲमेझॉन’वर झळकले.(Zero Sugar Chocolate for Kids Diabetics Spirulina for astronauts unique startup of young entrepreneurs of Jalgaon Jalgaon News)

Zero Choclate
Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात

आकाश इंगळे असे या युवा उद्योजकाचे नाव असून, त्याच्यासोबतीला भाऊ अनिकेत व सहकारी पूजा पाटील यांनी संयुक्तपणे या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. आकाश यांचे एम. टेक. (स्ट्रक्चरल) शिक्षण झाले आहे. त्यांनी बुडापेस्ट (हंगेरी) येथून एम.एस.ही केले. सध्या ते पुण्यातील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत. सोबतच औरंगाबादला ‘हेल्दी क्रम्बस्‌’ नावाने स्टार्टअपही सुरू केले आहे.

फूड इंडस्ट्रीमध्ये करिअर

आकाश इंगळे मूळचे जळगाव येथील. उच्च शिक्षणानंतर व्यवसाय करण्याकडे त्यांचा कल होता. मात्र, सामान्य कुटुंबातील युवकाला नेहमीच व्यवसाय अथवा उद्योग सुरू करताना अनेक अडचणी येतात. आकाश यांनाही त्या आल्या. मात्र, त्यांनी त्यावर मात करत नावीन्यपर्ण उद्योग सुरू करण्याचा निर्धार केला. फूड इंडस्ट्रीत करिअर करण्याचे त्यांनी ठरविले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Zero Choclate
Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष

असा केला सुरू उद्योग

आपल्या उच्चशिक्षणाचा उपयोग एखाद्या नव्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी करावा, या उद्देशाने त्यांनी ‘शूगर फ्री’ चॉकलेट उत्पादित करण्याचे ठरविले. पुण्यात नोकरी असल्याने सोबत हा उद्योगही विकसित करावा, म्हणून त्यांनी सोयीसाठी औरंगाबादला एक लहान युनिट सुरू केले. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘केसीआयएल’ या इन्क्युबेशन सेंटरने आकाश यांना या कामासाठी तांत्रिक व अन्य स्वरूपाचे मार्गदर्शनही केले आणि तेथूनच मार्च २०२२ पासून ‘हेल्दी क्रम्बस्‌’चा प्रवास सुरू झाला.

या कंपनीच्या माध्यमातून आकाश सध्या शूगर फ्री चॉकलेट उत्पादित करतात. हे चॉकलेट्स आरोग्याच्या दृष्टीने चांगले, मधुमेहींसाठी उपयुक्त आहेत. चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलांमध्ये दाताच्या समस्या निर्माण होतात. मात्र, या चॉकलेटमुळे दातांची समस्या उद्‌भवत नसल्याचा दावा आकाश यांनी केला आहे.

Zero Choclate
Jalgaon News : ‘फायनान्स’ कार्यालयाची तोडफोड प्रकरण भोवले; तालुका प्रमुखा विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल

अंतराळवीरांसाठी ‘स्पीरुलीना’

खरंतर शेवाळ हे तसे किळसवाणे. मात्र, ते नियंत्रित तापमान व योग्य हवामानात घेतले, तर त्यापासून पौष्टिक खाद्य तयार होऊ शकते. ASTRAUNAUTS FOOD अर्थात, अंतराळवीरांसाठीचे खाद्य म्हणून ‘स्पीरुलिना’ ओळखले जाते. त्याचेही उत्पादन हेल्दी क्रम्बस्‌ घेत असून, त्यालाही चांगली मागणी आहे. सध्या आकाश यांची ही उत्पादने औरंगाबाद, पुणे, जळगावच्या ठराविक दुकानांमध्ये तसेच ‘ॲमेझॉन’वरही उपलब्ध आहेत.

Zero Choclate
Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.