Jalgaon ZP CEO : तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट क्लासरूम करण्यावर भर : सीईओ अंकित

Officials welcoming newly joined Chief Executive Officer Ankit in Zilla Parishad.
Officials welcoming newly joined Chief Executive Officer Ankit in Zilla Parishad. esakal
Updated on

Jalgaon ZP CEO : ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी कायम तत्परता असेल. तत्कालीन सीईओ यांनी सुरू केलेले सेमी इंग्रजी शाळांचा कार्य कायम सुरू ठेवायचे आहे.

त्याला जोड म्हणून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट क्लासरूम करण्यावर अधिक भर असेल. शिक्षणासोबत कृषी विभागावर अधिक भर असेल, असे जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ अंकित पन्नू यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले अंकित यांनी सोमवारी (ता. २४) पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (zp CEO Ankit pannu statement about Emphasis on technology based smart classrooms jalgaon news)

श्री. अंकित यांनी यापूर्वी सोलापूर, गडचिरोली येथे सेवा बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांकडून जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कामाचा आढावा घेतला.

बनाना प्रोसेसिंगसाठी प्रयन्त

सीईओ अंकित म्हणाले, की जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या माध्यमातून केळी प्रक्रिया उद्योग कसे सुरू करून बचत गटांच्या माध्यमातून केळीला बाजारपेठेत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जलजीवन मिशन, आवास योजना, जलयुक्त शिवार या योजनांमध्ये चांगले काम करून जिल्हा नंबर एकवर कसा येईल, हा प्रयत्न राहणार आहे.

निवृत्तीच्याच दिवशी फाईल होईल पूर्ण

निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials welcoming newly joined Chief Executive Officer Ankit in Zilla Parishad.
Eknath Khadse : माध्यान्ह भोजन योजनेत राज्यात गैरव्यवहार; खडसेंची विधान परिषदेत ‘लक्षवेधी

मात्र, जिल्हा परिषदेतून निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याच्याबाबत असे होऊ नये, यासाठी प्रयत्न असेल. अर्थात कर्मचारी निवृत्त होत असेल, त्याच दिवशी त्याची फाइल पूर्ण करून पेन्शन लागू करायचा प्रयत्न राहणार असल्याचे सीईओ अंकित यांनी सांगितले.

जपान रिटर्न सीईओ

मूळचे हरियाणा राज्यातील रहिवासी श्री. अंकित यांनी आपले संपूर्ण शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आहे. आयआयटी बी.टेक, रिसर्च इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री. अंकित जपानला नोकरीसाठी गेले होते.

२०१६ ते २०१९ असे तीन वर्ष जपानमध्ये काम केल्यानंतर २०१९ मध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये जॉईन झाले. गडचिरोली येथे प्रांताधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर जळगाव जिल्हा परिषद सीईओ म्हणून ते रुजू झाले आहेत.

Officials welcoming newly joined Chief Executive Officer Ankit in Zilla Parishad.
Jalgaon NMU News : 5 वर्षांत 89 महाविद्यालये, 30 स्टार्टअप सुरू करणार; उमविच्या बृहत आराखड्यात शासनाकडे शिफारस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.