जळगाव : महासभेत ४२ कोटींच्या विकासकामांना भाजपने दिली एकमताने सहमती

महासभेत सत्ताधारी व विरोधक भाजप नगरसेवकांमध्ये चांगलेच वाद उफाळून आले होते.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationsakal
Updated on
Summary

महासभेत सत्ताधारी व विरोधक भाजप नगरसेवकांमध्ये चांगलेच वाद उफाळून आले होते.

जळगाव : शहरातील ४२ कोटींच्या विकासकामांना सोमवार च्या ऑनलाइन महासभेत(online meeting jalgaon carporation) मंजुरी देण्यात आली, कामांच्या मंजुरीसाठी सत्ताधारी व विरोधक नगरसेवक एकत्र सहमत झाले.सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात महापौर जयश्री महाजन(mayor jayashri mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मनपाची ऑनलाइन महासभा झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. सभेत सर्व विषयांना सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली आहे.

Jalgaon Municipal Corporation
सांगलीसारखाच भाजपचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम जळगावात; शिवसेनेचा डाव चालला, महापौरपदी जयश्री महाजन

सुरवातीला ४२ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रस्तावावर चर्चा करताना ॲड. शुचिता हाडा यांनी सूचना मांडली, ॲड. हाडा म्हणाल्या, की ४२ कोटीमध्ये यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक कामे रद्द करून नवीन कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात, रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, यानंतर राज्य शासनाकडून नगरोत्थान योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या ५८ कोटींच्या निधीत आता रद्द केलेली कामे प्राधान्याने घेण्यात यावी, त्यावेळी सर्व भाजप नगरसेवकांना पूर्णपणे विश्वासात घेण्यात यावे, अशी भूमिका मांडली. भाजपचे राजेंद्र घुगे- पाटील यांनीदेखील आता रद्द करण्यात आलेल्या मेहरुणमधील स्मशानभूमीचे काम ५८ कोटींच्या निधीत घेण्यात यावे, अशी सूचना मांडली. त्यावर ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी येणाऱ्या निधीत सर्वांना समसमान न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिल्याने सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Jalgaon Municipal Corporation
जळगाव : कोरोना व्हेरिएंट बदलला; उपचारही बदलले

‘त्या’ वादाचा विरोध मावळला

महापालिकेच्या १५ डिसेंबर २०२१ ला झालेल्या महासभेत सत्ताधारी व विरोधक भाजप नगरसेवकांमध्ये चांगलेच वाद उफाळून आले होते. आधी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना व्यासपीठावर बसू न देण्यावरुन भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी विरोध केला होता. त्यानंतर कुलभूषण पाटील यांच्या प्रभागातील कामे रद्द करून ते इतर तीन प्रभागामध्ये करण्यात यावी, अशी भूमिका मांडत विरोध करण्यात आला होता. त्यानंतर सदर पाच कोटींच्या कामांसोबत मनपा फंडातील ४ कोटी ५० लाखांची कामे वाढविण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे ५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. यात, भाजपच्या २६ नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर आजच्या महासभेत कैलास सोनवणे यांचा विरोध मावळल्याचे दिसून आले.

Jalgaon Municipal Corporation
गर्दीवरील नियंत्रणासाठी गुरुवारी कठोर निर्णय; गुलाबराव पाटील

माझ्यावर दबाव नाही : आयुक्त

आपल्यावर कोणाचाही दबाव नाही असे मत आयुक्त डॉ. सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. भाजप नगरसेविका उज्वला बेंडाळे यांच्या प्रभागातील प्रमुख रस्ते ४२ कोटींच्या कामामध्ये घेतले गेले नसल्याने आयुक्तांविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच ही कामे घेण्यात येऊ नये, म्हणून आयुक्तांवर कोणाचा दबाव होता का, असा प्रश्नदेखील उज्वला बेंडाळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आयुक्त सतिष कुलकर्णी म्हणाले, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मात्र, ४२ कोटी रुपयांमध्ये सर्वच रस्ते करणे शक्य नाही, त्यामुळे उर्वरित रस्त्यांचे काम ५८ कोटीमध्ये करण्यात येणार आहे. तुमचे रस्ते देखील ५८ कोटींच्या निधीत घेतले जातील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()