GD कॉन्स्टेबलच्या 25000 हून अधिक जागा रिक्त

SSC GD Constable Recruitment
SSC GD Constable Recruitmentesakal
Updated on

SSC GD Constable Recruitment 2021 : एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी (SSC GD Constable Recruitment) अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली असून यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीअंतर्गत सीएपीएफ, आसाम रायफल्ससह विविध सशस्त्र दलांमध्ये तब्बल 25271 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी SSC च्या अधिकृत वेबसाइटला ssc.nic.in भेट देऊन अर्ज करु शकता. या भरतीसंदर्भात माहिती देखील आपल्याला या वेबसाइटवर मिळू शकेल. तसेच, या भरतीनंतर तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपये वेतनश्रेणी मिळेल. याशिवाय, इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळणार आहेत.

Summary

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.

SSC ने GD कॉन्स्टेबल भरतीसाठी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी संगणक आधारित लेखी परीक्षा अर्थात, सीबीटी असेल. यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणी असणार आहे.

SSC GD Constable Recruitment
Indian Air Force ग्रुप-X, Y परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या अखेरीस?

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी वयोमर्यादा

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 18 वर्षे किंवा त्यावरील म्हणजे, जास्तीत-जास्त 23 वर्षांचे तरुण अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार, वरच्या वयोमर्यादेत सवलत मिळेल.

  • अर्ज शुल्क - आरक्षित वर्गासाठी अर्ज शुल्क 100 रुपये, तर इतर वर्गासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.

  • शैक्षणिक पात्रता - SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10 वी पास असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.