पुणे - पुणे महापालिकेत तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महापालिकेत ६५० जागांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून, तरुणांना सहा महिने विविध विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे.