Bank Jobs Applications: बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. पंजाब आणि सिंध बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 213 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना 15 सप्टेंबरच्या पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
बँकेच्या punjabandsindbank.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांना त्यांची पात्रता, नियम, अटी आणि पगाराबाबत आम्ही सांगणार आहोत.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर/अभियांत्रिकी पदवी/बीई/बीटेक/एमबीए/सीए/हिंदी-इंग्रजी विषयांसह पदव्युत्तर पदवी असवी.
1 ऑगस्ट 2024 पर्यंत पदानुसार उमेदवाराचे किमान वय 20/25/28 वर्षे आणि कमाल वय 32/35/38/40 वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे.
पंजाब आणि सिंध बँकेतील या भरतीमध्ये विविध पदांनुसार 48 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in ला भेट द्यावी.
वेबसाइटच्या होम पेजवर, रिक्रूटमेंट विभागात जावे आणि भरतीशी संबंधित अर्जाच्या लिंकवर क्लिक करावे.
आता नवीन पोर्टलवर, प्रथम नवीन नोंदणीसाठी क्लिक हियर वर जावे आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी.
यानंतर तुम्हाला इतर तपशील, स्वाक्षरी, छायाचित्र इत्यादी अपलोड करावे लागतील.
शेवटी तुम्हाला विहित शुल्क भरून पूर्णपणे भरलेला फॉर्म सबमिट करावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.