CRPF Salary : CRPFमध्ये नोकरी मिळाल्यास किती असेल पगार व कोणत्या सुविधा मिळतील? जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरी मिळावी, अशी बहुतांश तरुण-तरुणींची इच्छा असते. तुम्हालाही सीआरपीएफमध्ये (CRPF) नोकरी (Sarkari Nokari) मिळवायची असेल, तर जाणून घ्या सविस्तर माहिती…
CRPF Sarkari Naukri
CRPF Sarkari NaukriSakal
Updated on

CRPF Salary And Facilities : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) हे आपल्या देशातील राखीव सशस्त्र पोलीस दल आणि इंटर्नल कॉम्बेट फोर्स आहे. हे दल केंद्रीय सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत (MHA) कार्य करते. CRPF हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी व बंडखोरी रोखण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना पोलिसांच्या कार्यात मदत करणे हे या दलाचे प्राथमिक कार्य आहे.

CRPF Sarkari Naukri
Business Idea: 9 ते 5 नोकरीचा कंटाळा आलाय? घरी बसून करा हे 5 बिझनेस, पगारापेक्षा जास्त कमवाल

CRPF मध्ये कोणत्याही पदावर नोकरी (Sarkari Nokari) मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. देशातील बहुतांश तरुणवर्गाची CRPF मध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर आणि असिस्टंट कमांडंट अशा विविध स्तरांवर भरती केली जाते. त्यासाठी स्वतंत्र भरती परीक्षा घेतल्या जातात.

CRPF Sarkari Naukri
ZP Recruitment : झेडपी नोकरीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

CRPFमध्ये नोकरी मिळाल्यास किती पगार मिळेल तसंच कोणकोणत्या सुविधाही मिळतील, याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया…  

CRPF Sarkari Naukri
BARC Recruitment : भाभा अणू संशोधन केंद्रात काम करण्याची सुवर्ण संधी, एमएस्सी झालेल्यांनी त्वरीत करा अर्ज

सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी इतका मिळेल पगार

CRPF कॉन्स्टेबल (तांत्रिक आणि व्यापारी) हे केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) प्रवेश स्तरावरील पोस्ट आहे. पगार आणि अतिरिक्त भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार दिले जातात. अधिकृत अधिसूचनेनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना CRPF कॉन्स्टेबल वेतनश्रेणीमध्ये स्वीकार्य भत्त्यांसह वेतन स्तर-3 मध्ये 21 हजार 700 रूपयांपासून ते  69 हजार 100 रूपये वेतन मिळते. 

नव्याने भरती झालेल्या सीआरपीएफ कॉन्स्टेबलला दरमहा 25 हजार रुपये ते 30 हजार रुपये पगार मिळतो. सरकारकडून लागू होणारे विविध भत्ते आणि कपातीचा विचार करून CRPF कॉन्स्टेबलचा पगार निश्चित केला जातो. तसेच सीआरपीएफ कॉन्स्टेबलचा दरमहा पगार विविध गोष्टींवरही अवलंबून असतो. उदाहरणार्थ नोकरीची जागा, अनुभव, इत्यादी  

CRPF मध्ये मिळणारे भत्ते आणि सुविधा

उमेदवारांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त विविध भत्ते आणि फायदे देखील मिळतात. उमेदवारांना मिळणारे हे फायदे आणि भत्ते CRPF च्या पगारात समाविष्ट असतात. विविध अधिकार्‍यांसाठी CRPF लाभ आणि भत्ते खालील प्रमाणे…

  • महागाई भत्ता

  • एक्स ग्रेशिया भत्ता

  • लीव्ह इनकॅशमेंट फॅसिलिटी

  • सिटी कंपनसेटरी अलाउंस

  • डिटॅचमेंट अलाउंस

  • एचआरए भत्ता/निवास सुविधा

  • CRPF जवानांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा  

सीआरपीएफ कॉन्स्टेबल जॉब प्रोफाइल 

देशात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान सुरक्षा व्यवस्था व्यवस्थापित करणे ही सीआरपीएफ कॉन्स्टेबलची मुख्य भूमिका व जबाबदारी आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल जॉब प्रोफाइलमध्ये खाली नमूद केलेल्या कर्तव्यांचा समावेश असतो…   

  • दंगल नियंत्रण, गर्दी नियंत्रण इत्यादी गोष्टी हातळण्याची जबाबदारी

  • नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचाव आणि मदत कार्य.

  • निवडणुकीदरम्यान विशेषतः अशांत भागात सुरक्षा व्यवस्था व्यवस्थापित करणे आणि समन्वय साधणे.

  • VIP सुरक्षिततेची खात्री करणे  

  • संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भाग घेणे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.