Flipkart मध्ये Work From Home करणाऱ्यांसाठी मोठी संधी, जाणून घ्या

Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून अर्ज मागवले आहेत.
Flipkart
Flipkartesakal
Updated on

Flipkart Job : रिक्त पदे भरण्यासाठी फ्लिपकार्ट देशव्यापी भरती मोहीम राबवणार आहे. देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart लवकरच फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांसाठी मोठी भरती करणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

Flipkart
Flipkart sale : हे ४ स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी

ई-रिटेलर कंपनीने रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या जॉब अलर्टचा फायदा असा आहे की पात्र उमेदवारांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून अर्ज मागवले आहेत.

Flipkart
Flipkart sale : या स्मार्टफोनवर मिळत आहे ५ हजार रुपयांची सूट

नोकऱ्यांबद्दल अधिक माहिती कंपनीच्या लिंक्डीन पेजवरून किंवा फ्लिपकार्ट करिअर साइटवरून उमेदवारांना मिळू शकणार आहे. फ्लिपकार्टनं नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा असेल असं जाहीर केलं आहे.

Flipkart
Flipkart Sale : Nothing Phone 1 आणि Google Pixel 6aवर ५ हजारांची सूट

Flipkart दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि इतर प्रदेशांमध्ये WFH मॉडेलसह विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. ई-रिटेलर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. भरती प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने केली जाईल म्हणजेच मुलाखती ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील.

Flipkart
Flipkart Sale : मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, येथे पाहा यादी

कंपनीच्या धोरणानुसार, प्रतिनिधींना अधिक चांगली संधी दिली जाईल जेणेकरून ते कामात नावीन्य आणू शकतील. निवेदनात म्हटले आहे की कंपनीच्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे काम करावे लागेल की कंपनी स्पर्धात्मक आणि बाजारातील परिस्थितीशी सुसंगत राहू शकेल. त्यामुळे फ्लिपकार्टमध्ये नॊक्ररीची सुवर्णसंधी फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.