India Post Recruitment 2021 : भारतीय डाक विभागाने उत्तर प्रदेशमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या 4226 पदांसाठी भरती काढलीय. यासाठी 10 वी पास विद्यार्थीही अर्ज करू शकतात. गुणवत्तेच्या आधारावर या सरकारी नोकरीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तर, दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्टपासून सुरू झाली असून 22 सप्टेंबरपर्यंत ती चालेल. या भरतीकरिता आपला अर्ज पोस्ट विभागाच्या appost.in वेबसाइटवर जाऊन भरावा. दरम्यान, या ग्रामीण डाक सेवक भरती अंतर्गत सहाय्यक शाखा पोस्टमास्तर आणि शाखा पोस्ट मास्तरची पदे भरली जाणार आहेत.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना आता टपाल विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
ग्रामीण डाक सेवक भरती 2021 : अशी होईल निवड प्रक्रिया
ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये 10 वी गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
जर पात्रता दहावीपेक्षा जास्त असेल, तर त्याला कोणताही विशेष दर्जा मिळणार नाही.
जर दोन उमेदवारांना समान गुण असतील, तर जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य मिळेल.
जर दोन उमेदवारांचे गुणांसह समान वय असेल, तर ज्या उमेदवाराने आधी अर्ज केला असेल, त्याला प्राधान्य दिले जाईल.
जर एकाच अर्जासह दोन उमेदवारांचे गुण आणि वय समान असेल, तर सायकलिंगमध्ये पारंगत असलेल्या उमेदवाराला प्राधान्य असेल.
जर वय, गुण आणि सायकलिंगमध्ये प्राविण्य देखील समान असेल, तर संगणकामध्ये कुशल असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
यूपी पोस्टल सर्कल GDS भरती 2021 : रिक्त पदांच्या जागा
सामान्य- 1988
इडब्लूएस- 299
ओबीसी- 1093
पीडब्लूडी ए- 16
पीडब्लूडी बी- 20
पीडब्लूडी सी- 17
एससी- 797
एसटी- 34
यूपी पोस्टल सर्कल GDS भरती : वेतन
BPM - 12,000 ते 14,500 रुपये
एबीपीएम/डाक सेवक - 10 हजार ते 12 हजार रुपये
वयोमर्यादा - जीडीएस भरतीसाठी किमान वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.