Latest Govt Jobs Notifications : अनेक विभागांमध्ये सरकारी नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. यात 10 वी उत्तीर्णांसाठी, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा, डिग्री शैक्षणिक अभ्यासक्रम इत्यादींचा समावेश आहे. या आठवड्यात नेमक्या कोण कोणत्या सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याबाबत जाणून घेऊया.
बीएसएफ ट्रेड्समन भर्ती 2023
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) लवकरच त्याच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे rectt.bsf.gov.in वर कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी भरती अधिसूचना जारी करेल अशी अपेक्षा आहे. BSF मध्ये एकूण 1410 रिक्त जागा भरणे अपेक्षित आहे त्यापैकी 1343 पुरुष उमेदवारांसाठी आणि 67 रिक्त जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.
इंडिया पोस्ट GDS भर्ती 2023
इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक या पदांसाठी रिक्त जागा आहेत. 27 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत, इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.indiapostgdsonline.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार 17 ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्जात सुधारणा करू शकतात.
पोलीस भरती 2023
तुम्ही आसाम वन विभागाअंतर्गत 2649 फॉरेस्टर, ड्रायव्हर, कॉन्स्टेबल आणि इतर पदांसाठी अद्याप अर्ज केला नसेल, तर तुम्ही आजपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज करू शकता. www.slprbassam.in या अधिकृत वेबसाइटवरून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे.
LIC AAO 2023 अधिसूचना
भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा LIC ही देशातील सर्वात मोठी विमा क्षेत्रातील कंपनी आहे. या वर्षी देखील LIC ने जनरलिस्ट कॅडर मध्ये AAO च्या रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली होती. त्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. आता यासाठीची परीक्षा 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पूर्व परीक्षा होऊ शकते. (Job Apportunity)
CISF ASI HCM प्रवेशपत्र 2023 अपडेट
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (गृह मंत्रालय) सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) या पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांसाठी शारीरिक मानक चाचणी (PST) आणि कागदपत्रे पडताळणी (DV) आयोजित करेल. उमेदवार अकाउंटमध्ये लॉग इन करून CISF ASI HC PST DV 2023 शी संबंधित अपडेट तपासू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.