RRB Paramedical Recruitment 2024 Apply Online
नवी दिल्ली : रेल्वे विभागामध्ये देशभरात पॅरामेडिकल स्टाफची भरती निघाली आहे. तब्बल १३७६ जागांसाठी रेल्वेने भरती प्रक्रिया सुरु केली असून १७ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरु झाली आहे. उमेदवारांना १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
आहारतज्ज्ञ : ५ पदे
नर्सिंग अधीक्षक: 713 पदे
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट: 4 पदे
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट: 7 पदे
डेंटल हायजिनिस्ट: ३ पदे
डायलिसिस तंत्रज्ञ: 20 पदे
आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-३: 126 पदे
प्रयोगशाळा अधीक्षक: 27 पदे
परफ्युजनिस्ट: 2 पदे
फिजिओथेरपिस्ट ग्रेड-२: 20 पदे
थेरपिस्ट: 2 पदे
कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन: 2 जागा
फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी): 246 पदे
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन: 64 पदे
स्पीच थेरपिस्ट: 1 पोस्ट
कार्डियाक टेक्निशियन: 4 पदे
ऑप्टोमेट्रिस्ट: 4 पदे
ECG तंत्रज्ञ: 13 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड-२: 94 पदे
फील्ड वर्कर : १९ पदे
एकूण पदे- १३७६
पदांसाठी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे ४४९००, ३५४००, २९२००, २५५००, २१७०० आणि १९०० असा ग्रेड पे पदानुसार राहणार आहे. यामध्ये महागाई भत्ता आणि इतर केंद्र सरकारचे भत्ते जोडून मिळतील.
अर्जदारांना विहीत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. जाहिरातीमध्ये त्याबाबत सविस्तर दिलेले आहेत. तसेच अर्जदाराने मेडिकली फीट असणं गरेजचं आहे. याशिवाय वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये आरक्षणानुसार वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
शुल्क किती? Examination Fee
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जाची फी रु 500 आहे. तर SC, ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) मधील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 250 रुपये आहे. शैक्षणिक पात्रता आणि देशभरातील विभागानुसार जागांच्या माहितीसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
मुंबईत किती जागा?
मुंबईतल्या सेंट्रल आणि वेस्टर्न या दोन्ही झोनमध्ये मिळून २३६ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ११९, एससीसाठी ३४, एसटीसाठी १७, ओबीसीसाठी ४१ आणि ईडब्ल्यूएससाठी १५ जागा आहेत. अशा एकून मुंबईतल्या दोन्ही झोनमध्ये २३६ जागा रिक्त आहेत. मुंबई रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवरही सविस्तर माहिती उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाईट : www.rrbmumbai.gov.in
ऑनलाइन अर्ज कसा करावा? CEN PARAMEDICAL POSTS Application Link
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाची वेबसाईट www.rrbapply.gov.in या लिंकवर क्लिक करावे. वेबसाईटवर Apply या टॅबवर क्लिक करावे. तुम्हाला Create An Account हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. उमेदवाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक आणि अन्य कागदपत्रे जोडावे लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.