Seasonal Jobs Increased In Maharashtra, Mumbai, Pune And Nagpur:
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हंगामी तत्त्वावरील नोकऱ्यांसाठी भरती करण्यास सुरुवात झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हंगामी भरतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ही वाढ प्रामुख्याने महानगरांमध्ये आणि द्वितीय व तृतीय स्तरीय शहरांमध्ये पाहायला मिळत आहे, असे 'इनडीड इंडिया' या मनुष्यबळ सेवाक्षेत्रातील कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, हंगामी नोकऱ्यांमध्ये मुंबई, बंगळूर, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या प्रमुख महानगरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ ते २० टक्के वाढ झाली आहे.
नागपूर, जयपूर, वडोदरा, कोची, लखनौ, गुरुग्राम या मध्यम आकाराच्या शहरांमध्येदेखील हंगामी कर्मचाऱ्यांच्या भरतीत २२ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वस्तू घरपोच देणारे कर्मचारी (डिलीव्हरी बॉय), वेअरहाऊस कर्मचारी आणि समन्वयक यांची सर्वाधिक मागणी असून, ई-कॉमर्स, रिटेल, आणि लॉजिस्टिक क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
शहरांमधील ग्राहकांचे वाढते उत्पन्न हे या वाढीमागील मुख्य कारण आहे आहे, तसेच तसेच इंटरनेटच्या विस्तारामुळे ई-कॉमर्स, रिटेल आणि लॉजिस्टिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
या कंपन्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी अधिकाधिक हंगामी कर्मचारी नियुक्त करत आहेत. छोट्या शहरांमध्ये आणि निमशहरी भागांमध्ये वाढलेली हंगामी कर्मचाऱ्यांची भरती ही या बाजारपेठेतील क्षमतावाढीची द्योतक आहे.
सणांच्या काळात कंपन्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अधिक कर्मचारी नियुक्त करत आहेत, असे 'इनडीड इंडिया' कंपनीच्या विक्री विभागाचे प्रमुख शशी कुमार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.