Swiggy Layoff: आता 'स्विगी'कडूनही मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा; सीईओ म्हणाले...

जगावर बेरोजगारीचं संकट कोसळायला लागलं असून आता फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं देखील कर्मचारी कपात घोषित केली आहे.
Swiggy
Swiggy
Updated on

नवी दिल्ली : जगावर बेरोजगारीचं संकट कोसळायला सुरुवात झाली आहे. अनेक बड्या कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात सुरु केली आहे. त्याता आता भारतातील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं देखील कर्मचारी कपात घोषित केली आहे. (trend of layoffs at peak in the World Swiggy also doing Layoffs)

Swiggy
Avdhoot Gupte in Politics: अवधूत गुप्तेची राजकारणात एन्ट्री? 'झेंडा'च्या सिक्वलबाबत मोठी घोषणा

स्विगीनं ३८० कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. हा आमच्यासाठी मोठा कठीण निर्णय असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. स्विगीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. हा आमच्यासाठी मोठा कठीण निर्णय असल्याचं स्विगीच्या सीईओंनी म्हटलं आहे.

Swiggy
खतरों के खिलाडी! यांचं नाव घेताच भारताचे दुश्मन थरथर कापतात : Ajit Doval

कर्मचाऱ्यांना पाठवला ई-मेल आणि मागितली माफी

स्विगीचे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल केला असून सर्व शक्यतांचा विचार करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यामध्ये अनेक कारणं त्यांनी सांगितले आहेत. यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

स्विगीनं का घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय

स्विगीनं कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना विविध कारणांचा उल्लेख केला आहे. कंपनीसमोर सध्या आव्हानात्मक मायक्रोइकॉनॉमिक स्थिती आहे. अनेक आव्हानांचा कंपनी सध्या सामना करत आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाला आहे. त्यामुळं नफ्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी स्विगीकडं पुरासा निधी असल्याचं मात्र कंपनीनं स्पष्ट केलं आहे. क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी भरतीलाही कंपनीनं यासाठी दोषी ठरवलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()