Positive Story: थेट विक्री, मूल्यवर्धनासाठी ‘होम डिलिव्हरी चिकन’ 

Positive Story: थेट विक्री, मूल्यवर्धनासाठी ‘होम डिलिव्हरी चिकन’ 
Updated on

अमरावती येथील शरद भारसाकळे यांनी पोल्ट्री उत्पादकांसोबत करार शेती केली. त्या पुढे जाऊन विक्री व्यवस्था मजबूत करण्यासाठी व उद्योगाचे मूल्यवर्धन करण्यासाठी चिकनची ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली. आज सुमारे तीन हजार ग्राहकांचे नेटवर्क उभारून, संकल्पनेचे ‘प्रमोशन’ करून दिवसाला एक टन विक्रीपर्यंत त्यांनी भरारी मारली आहे.

अमरावती येथील रहिवासी असलेल्या डॉ. शरद भारसाकळे यांचे वडील नारायणराव हे शेतकरी. सात एकर कोरडवाहू जमीन. पाण्याची सुविधा नसल्याने ते पारंपरिक पिके घेत. शरद यांनी पोल्ट्रीशास्त्र विषयातून एमव्हीएस्सीची पदवी घेतली. शिक्षण घेत असतानाच त्यांना पोल्ट्री क्षेत्रातील संधीचा आवाका लक्षात आला. हा व्यवसाय विदर्भात फायदेशीर ठरू शकतो हा विचार मनात आला. तो अल्पावधीत प्रत्यक्षात आणला. त्यापूर्वी या क्षेत्रातील बारकावे जाणण्यासाठी खोपोली येथील पोल्ट्री व्यावसायिकाकडे नोकरी केली. अवघा पंधराशे रुपये मेहनताना मिळायचा. मात्र पैशापेक्षा अनुभव मोठा होता. दोन वर्षे काम केल्यानंतर अमरावती येथील कुक्कुटपालकाकडे त्यांनी काम केले. 

करार शेतीतील पोल्ट्रीचा ‘पॅटर्न’
छोट्या शेतकऱ्यांचे हीत समोर ठेवत एक हजार पक्ष्यांच्या मॉडेल फार्मची संकल्पना शरद यांनी मांडली आहे. त्याअंतर्गत विदर्भ व दुर्गम मेळघाटातील शेतकऱ्यांसोबत ब्रॉयलर पक्ष्यांची करार शेती सुरू केली. एक दिवसाचे पक्षी, औषधे आणि दोन किलो वजन वाढीसाठी आवश्यक पशुखाद्याचा पुरवठा ‘अमृता हॅचरीज ॲण्ड फूड’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. व्यवसायात स्थिरताही आली. 

व्यवसायाचे मूल्यवर्धन 
केवळ करार शेतीपुरते अवलंबून राहताना विक्री व्यवस्था मजबूत होत नव्हती. व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागे. स्वतःच चिकन उद्योगात उतरल्यास विक्रीबरोबर मूल्यवर्धनही होणार होते. ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देण्याची कल्पना पुढे आली. त्या दृष्टीने मग व्यवसायाची रचना, पद्धती व कामकाज बदलण्यास सुरुवात केली. आज चार वर्षांपासून त्यात सातत्य ठेवत वृद्धी केली आहे. 

ग्राहकांची मागणी ओळखली 
ग्राहकांकडून कोणत्या मांसाहारी उत्पादनांना मागणी आहे हे ओळखले. 
चिकनमध्ये ‘लेग पीस’ला सर्वाधिक मागणी राहते हे लक्षात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काम करण्यास सुरुवात केली.   
घरपोच ‘डिलिव्हरी’ करताना ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर मागणी नोंदवावी लागते. त्यासाठी ‘कस्टमर केअर प्रतिनिधी’ म्हणून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 
मागणीची संगणकाद्वारे नोंद घेतली जाते. 
ग्राहकांना कमीत कमी वेळेत पुरवठा करता यावा याकरिता पाच आउटलेट्‍स अमरावती शहराच्या विविध भागांत उभारण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी खास ‘सॉफ्टवेअर’ची मदत घेतली आहे. 

आरोग्य स्वच्छतेचे पालन 
चिकनच्या आरोग्य स्वच्छता अनुषंगाने सर्व काळजी घेण्यात येते.
स्वतः पशुवैद्यक असल्याने त्यातील सर्व बाबी माहिती आहेत. 
पक्षी निरोगी ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येतात.  
दुकानाच्या स्वच्छतेच्या वेळा तयार केल्या आहेत. 
औषधे कोणती वापरावीत याचे शेड्यूल तयार केले आहे. 
आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून ग्राहकांना पुरवठा केला जातो. थोडक्यात, ‘हायजेनिक’ पद्धतीचा वापर करून वजन आणि पॅकिंग करून बिलासोबत ग्राहकाला चिकनचा पुरवठा होतो. 

प्रमोशन 
होम डिलिव्हरी चिकनचे प्रमोशन करण्यासाठी एफएम रेडिओचा आधार घेतला. शिवाय रिक्षाला पोस्टर्स लावूनही जाहिरात केली. याशिवाय सोशल मीडियातील प्रकारांचा आधार घेतला. ग्राहकांशी दूरध्वनीवरूनही संवाद साधला. 

होम डिलिव्हरीची यंत्रणा
ऑनलाइन पद्धतीने अन्नपुरवठ्याला नजीकच्या काळात वाढता प्रतिसाद आहे. कोरोना संकटात तर हॉटेलमध्ये जाऊन जेवण घेण्याऐवजी ग्राहक घरीच जेवण घेणे पसंत करीत आहेत. त्याच धर्तीवर शरद यांनी होम डिलिव्हरीची यंत्रणा सक्षम केली आहे. त्यासाठी दहा दुचाकी खरेदी केल्या. साहजिकच  दहा ‘डिलिव्हरी बॉइज’ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना प्रत्येक ऑर्डरमागे ठरावीक कमिशन दिले जाते. दिवसभरात सरासरी दोनशेपर्यंत ऑर्डर्स राहतात. या सर्व ग्राहकांना वेळेत पुरवठा होतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिकनच्या दरात दररोज चढ-उतार होतात. या बदलांचा फायदा ग्राहकांना मिळतो. पॅकिंग आणि डिलिव्हरी खर्च आकारला जात नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी हा फायद्याचा सौदा ठरतो. शहरात उभारलेल्या पाच आउटलेट्‍सवरूनही थेट विक्रीदेखील होते. 
ऑर्डर दिल्यानंतर दोन तासांत पोहोचवण्याचा प्रयत्न.  
किचन फूड ग्रेड प्लॅस्टिक बॅगेतून दिले जाते. वाहतुकीत खराब होऊ नये यासाठी दुचाकीत आइस क्यूब्सचा वापर 

मूल्यवर्धित व्यवसायातील ठळक बाबी 
मेळघाटातील ८१, तर विदर्भातील २५० शेतकऱ्यांसोबत करार 
त्यातून महिन्याला सुमारे ११ लाख किलो चिकननिर्मिती. 
आउटलेट्‍सची संख्या- ५- (सर्व अमरावती शहरांत) 
शिवाय होम डिलिव्हरीमध्ये एक हजार ते तीन हजार ग्राहकांचे नेटवर्क
एकूण सर्व विक्री- एक टन प्रति दिन
चिकनचा दर- किलोस १५० ते १८० रुपये. अर्थात, यातही बदल होत राहतात.  
वार्षिक उलाढाल- काही कोटी रुपयांपर्यंत.  
ब्रॅण्डचे नाव- अमृता चिकन 
 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार- सुमारे २५० हून अधिक व्यक्तींना  

 डॉ. शरद भारसाकळे, ९३७०१५४५५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.