एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

Patan Taluka Landslide
Patan Taluka Landslideesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : पावसाची (Heavy Rain In Patan) दाणादाण, भूस्खलनाने (Patan Taluka Landslide) तीस फुटांचे चिखलाचे डोंगर कापत एनडीआरफसहीत (NDRF Team Pune) स्थानिक प्रशासनाचे सुरू असलेल्या मदतकार्याला हातभार लावण्यासाठी शेकडो हात सरसावले आहेत. सलग तीन दिवस कऱ्हाड, सातारा, पाटणसहीत त्या भागातील स्थानिक स्वयंसेवक निसर्गाच्या प्रलयाची विदारक स्थिती सावरण्यासाठी शासनाच्या खांद्याला खांदा लावून झटत आहेत. त्या मदत कार्यातील लोकांना अनेकांनी जेवणाचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे एकमेका सहाय्य करू अवेघ धरू सुपंथ याचीच अनुभूती येत आहे. मदतकार्याचे लोंढे आंबेघर, मिरगाव, ढोकावळेच्या दिशेने तीन दिवसांपासून जात आहेत. व्यक्तीगतसह संस्थात्मक पाचळीवरही मदत करणाऱ्यांचा समावेश आहे. (Citizens Help In Landslide Affected Ambeghar Mirgaon Dhokavale Villages bam92)

Summary

सलग तीन दिवस कऱ्हाड, सातारा, पाटणसहीत त्या भागातील स्थानिक स्वयंसेवक निसर्गाच्या प्रलयाची विदारक स्थिती सावरण्यासाठी शासनाच्या खांद्याला खांदा लावून झटत आहेत.

आंबेघर, मिरगावसहीत ढोकावळेत भूस्खलनात तब्बल ३१ जण बेपत्ता झाले. गाडले गेलेल्यांचे शोधकार्य शुक्रवारपासून सुरू आहे. आजअखेर २२ मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्यापही तीन एनडीआरफची पथकाव्दारे शोध सुरूच आहे. त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्याभरातील स्वयंसेवक झटत आहेत. राडारोडा हलविण्यासाठीही बाहेरून आलेल्या स्वयंसेवकाचाही हातभार लागला आहे. सुविधा नसतानाही आंबेघरला चार किलोमीटर चालत स्वयंसेवक पोचले आहेत. मिरगाव, ढोकावळेतही अनेकांचे मदतकार्य सुरू आहे. राडारोडा बाजूला सारण्यासहीत मदत करणाऱ्यांना जेवणाचाही सोय केली जात आहे. कऱ्हाडहून दक्ष कऱ्हाडकर, सह्याद्री ट्रेक्टर्स, रणजीत नाना मित्र परिवार, अनुनी इन्फ्रास्ट्रक्चर्स, शिवराज ढाबा, डिस्काय हॉटलसहीत अनेकांचे हात राबले आहेत.

Patan Taluka Landslide
छातीशी बिलगलेला पोटचा गोळा सोपवताना, त्यांचा पाय घसरला तर?

रणजीत नाना मित्र परिवाराच्या माध्यमातून १०० लोकांच्या जेवणाची सोय झाली. एनडीआरफच्या पथकासहीत स्थानिक शासकीय व मदत कार्यात सहभागींना त्यांनी जेवण दिले. चिखलाच्या भिंती चिरत शासनाच्या खांद्याला खांदा देत संस्था, व्यक्तीगत स्वयंसेवक व स्थानिक समाजसेवा करणारे ग्रुपही येथे आहेत. कोयना डिस्कव्हर व संपतराव जाधव मित्र परिवाराच्या सदस्यांनीही मदतकार्यात भाग घेतला आहे. कोयना डिस्कव्हर ग्रुपने मिरगाव, मानाईनगर, नवजा भागातील २०० हून अधिक ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी हलवले. बोटीने लोकांना बाहेर काढून त्यांच्या दवापाण्यासहीत जेवणाची सोय केली. मिरगाव येथे मातीचे ढिगारे हलविण्यासाठी कोयना डिस्कव्हरचे सदस्य झटले. तेथील मृतदेह बाहेर काढण्यातही हातभार लावला. अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्यांना साथ देण्यासाठी स्वयंसेवकांनी संकट समयी लावलेला हातभार महत्वाचा ठरला.

Patan Taluka Landslide
प्रसंगी कायदा बदलू, पण मदत जरुर करू; एकनाथ शिंदेंची ग्वाही

कऱ्हाडचा पोकलेन ढोकावळेत

ढोकावळे येथे चार मृतदेसह सापडले. तेथील राडारोडा हलविण्याचे मोठे काम बाकी होते. त्या कामासाठी लागणारा पोकलेन कऱ्हाडच्या अनुनी इन्फ्रास्ट्रक्चरने शासनाला दिला आहे. तीन दिवसांपासून ते तेथे कार्यारत आहेत. पोकलेनसहीत एनडीआरफच्या पथकाने तेथे मदतकार्य सुलभपणे राबविता आहे.

Citizens Help In Landslide Affected Ambeghar Mirgaon Dhokavale Villages bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()