काेणी काेणाचं नसतं! ग्रामस्थांनी खाेट ठरवत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिलं

काेणी काेणाचं नसतं! ग्रामस्थांनी खाेट ठरवत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिलं
Updated on

केळघर (जि. सातारा)  : आदिवासी कातकरी कुटुंबातील कर्त्या व कमावत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याने म्हाते बुद्रुक येथील कुटुंबाला आधार देण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन 50 हजार रुपये निधी जमवला. हा निधी या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी म्हाते बुद्रुक येथील आदिवासी कातकरी कुटुंबातील संजय पवार हे झाडावरून पडून जखमी झाले होते. मज्जारज्जूला मार लागल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. त्यावेळीही ग्रामस्थांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी ग्रामस्थ पुढे आले. सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थ, तालुक्‍यातील दानशूर व्यक्तींनी 50 हजार रुपये निधी उभा करून संजय पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. पवार यांच्या कुटुंबीयांकडे निधी देताना मेढा सोसायटीचे संचालक राजाराम गोगावले, उपसरपंच अशोक सपकाळ, शांताराम सपकाळ गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
आदिवासी कातकरी कुटुंबातील कर्त्या व कमावत्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूनंतर या कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून म्हाते बुद्रुक ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने निधी जमा करून या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले आहे. भविष्यातही या कुटुंबाला मदत करून गावकरी या कुटुंबाचे दुःख हलके करण्यासाठी प्रयत्न करतील, असे सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंगटे यांनी सांगितले.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वे कामात अधिकाऱ्यांचा मुजोरपणा; साताऱ्यासह कोरेगावातील शेतकऱ्यांची तक्रार

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.