Positive Story: क्वालिटीची कमाल; सोलापुरातील खवा परराज्यातही झाला 'फेमस'

dengale-family
dengale-family
Updated on

शेती अवघी एक एकर शेती. मात्र संघर्ष, संकटांना तोंड देत प्रयत्नवाद, चिकाटी व उद्यमशीलतेतून पांगरी (जि. सोलापूर) येथील अमोल व सरिता या डेंगळे दांपत्याने खवानिर्मिती व्यवसाय यशस्वी केला आहे. दररोज पाचशे किलो दूध संकलनातून दिवसाला १०० किलो खवा उत्पादनातून गुणवत्तेच्या जोरावर स्थानिकसह परराज्यांतील बाजारपेठही मिळवली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात बार्शीपासून २० किलोमीटरवर पांगरी गाव आहे. द्राक्ष, कांदा, भाजीपाला, तूर, सोयाबीन ही पिके होतात. दुग्ध व्यवसायही बऱ्यापैकी आहे. पांगरी या परिसरातील बाजारपेठेचं प्रमुख आणि मोठं गाव आहे. आजूबाजूच्या पाच-दहा खेड्यांचा नित्य संपर्क गावाशी असतो. गावातील अमोल डेंगळे यांची एक एकर शेती आहे. आई अन्नपूर्णा, पत्नी सरिता, मुली वैष्णवी, मीनाक्षी, लक्ष्मी, गौरी आणि अनुराधा या पाच चिमुकल्यांसह ते शेतातच वास्तव्यास आहेत. लहान असतानाच अमोल यांचे वडील गेले. आईनं कसंबसं त्यांना शिकवलं. सन १९९६ च्या सुमारास बारावीचे शिक्षण झाल्यानंतर घरची सगळी जबाबदारी अमोल यांच्यावर पडली. बोअरच्या पाण्यावर ते हंगामी शेती कसत. मात्र अवघ्या एक एकरातील उत्पन्नावर घर भागणं कठीण होतं. मग शाळा सोडून त्यांनी ‘ड्रायव्हिंग’चा व्यवसाय सुरू केला. शेतीसोबत दुहेरी कसरत करत घराचा गाडा चालवला.

Positive News: सौरऊर्जेने उजळली डोंगरवस्तीवरील घरे 

बिकानेर दौरा ठरला ‘टर्निंग पॅाइंट’
एकदा मालवाहतुकीवेळी बिकानेरला (राज्यस्थान) गेले असताना (सन २०००) तिथे दुष्काळी भागात संपूर्ण यांत्रिकी पद्धतीने यशस्वी खवानिर्मिती उद्योग पाहण्यास मिळाला. आपल्याकडेही असा प्रयत्न निश्‍चित होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात पक्के बसले. विविध अडचणींमुळे विचार प्रत्यक्षात आणण्यास पाच वर्षे गेली. पण मग २००५ मध्ये ‘ड्रायव्हिंग’ सोडून थेट या व्यवसायात उडी घेतली. आर्थिक अडचण होती. पण त्यावरही मात केली. दहा गायी होत्या. त्याच्या दुधापासून चुलीवरच्या भट्टीवर खवानिर्मिती सुरू झाली. 

Positive Story: नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीत करिअर ‘करून दाखविले’

केले यांत्रिकीकरण  
सुरुवातीला तीन किलो उत्पादन केले. त्याविषयी फारशी माहिती नाही, प्रशिक्षण नाही. अनेक चुकाही झाल्या. अनुभवातून व शिकत त्या सुधारल्या. पुढे आठ ते १० वर्षे चुलीवर दूध आटवून खवा तयार होत राहिला. त्यात धुराचा मोठा त्रास सहन करावा लागला. पण डेंगळे मागे हटले नाहीत. मग २०१८ मध्ये ‘स्टीम बॉयलर’ यंत्र खरेदी केले. प्रत्येकी ४० लिटर दूध साठवण्याची क्षमता असणाऱ्या सहा कढया खरेदी केल्या. त्यातून रोजच्या धुरातून सुटका झाली आणि वेळेतही बचत होऊ लागली. जिल्हा उद्योग केंद्र आणि बँक ऑफ इंडियाकडून अर्थसाह्य झालं. 

अशी होते खवानिर्मिती 
बॉयलरच्या माध्यमातून जोडलेल्या कढईमध्ये दूध उकळायचं.  
बॉयलरमधील वाफेवर १५ मिनिटांत दूध उकळतं. 
पुढील १५ मिनिटांत खवा तयार होतो.
तो थंड होण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर विक्रीसाठी पाठवला जातो. 
पाच लिटर दुधापासून एक किलो खवानिर्मिती.
४० लिटर क्षमतेच्या सहा कढयांमुळे एकाचवेळी ४२० लिटर दूध उकळले जाऊ शकते.

गुंतवणूक 
या व्यवसायात बॉयलर, कढया व अन्य मिळून सुमारे २२ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागल्याचे अमोल यांनी सांगितले. शेतातच उत्पादन युनिट असल्याने जागेचा खर्च वाचला.

दूध उत्पादकांची सोय
पांगरी आणि परिसरातील चिखर्डे, गोरमाळे, इंदापूर अशा काही गावांतील शेतकऱ्यांकडून होते दूध खरेदी. त्यासाठी चारचाकी वाहन घेतले आहे. त्यातून शेतकऱ्यांचीही सोय होते.  
रोजचे २०० ते ५०० लिटरपर्यंत दूधसंकलन असते. शेतकऱ्यांना प्रति लिटर २७ रुपये दर देतात. 
दूध संकलनासाठी काही बेरोजगार तरुणांनाही काम दिले आहे. त्यांना प्रतिलिटर एक-दोन रुपये कमिशन.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खव्याची बाजारपेठ 
पुणे शहरातील डेअरी, हैदराबाद येथील खव्याची बाजारपेठ, स्थानिक स्तरावरील मिठाईची दुकाने आदी ठिकाणी आपल्या खव्याला बाजारपेठ दिली आहे. किलोला २०० रुपये दर आहे.
सुरुवातीला नमुना मोफत द्यावा लागला. हळूहळू गुणवत्तेमुळे त्याला मागणी येऊ लागली.
दररोज सुमारे १०० किलोपर्यंत विक्री.
महिन्याला सुमारे ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 
पत्नी सरिता यांची मोठी साथ व्यवसायात मिळते. लॉकडाउनपूर्वी दोन कामगार कार्यरत होते. 
या काळात नुकसानही खूप झाले. पण उद्योग आता सावरतो आहे. 

तूप, बासुंदीही 
खव्यापाठोपाठ ग्राहकांच्या मागणीनुसार मलई पेढा, बासुंदी आणि तूप उत्पादनही सुरू केले आहे. त्यासाठी कल्पतरू ब्रॅण्ड तयार केला आहे. तुपासाठी बॉटल पॅकिंग केले आहे. त्यालाही मागणी आहे.  पेढा, बासुंदी  २२० रुपये प्रति किलो, तर तुपाची ५५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. 

अमोल डेंगळे, ९६०४९८५११५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.